संकेश्वर (महंमद मोमीन) : शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरणी करुन आकाशाकडे डोळा लावून बसण्यापेक्षा हवामानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी खरीपाची पेरणी करायला हवी असल्याचे संकेश्वर श्री शंकरलिंग कृषी पत्तीन सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष कुमार बस्तवाडी यांनी सांगितले. संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सोयाबीन बियाणे वितरण कार्यक्रमात शेतकऱ्यांना उद्देशून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपाध्यक्ष कुमार बस्तवाडी, संचालक रामण्णा किल्लेदार, सुनिल पर्वतराव, गिरीश कुलकर्णी, आणप्पा संगाई, गणपती कुटोळी, सदा कब्बूरी, मुरारी हेगडे, पुंडलिक कुंभार (सीईओ) बाळू शेंडे यांच्या हस्ते शेतकरी सभासदांना सोयाबीन बियाणांचे वितरण करण्यात आले. कुमार बस्तवाडी पुढे म्हणाले शेतकऱ्यांनी हवामान खात्याकडून पावसाची माहिती मिळवून खरीपाची पेरणी केल्यास बियाणे वाया जाणार नाहीत. आमच्या संस्थेने उत्तम दिव्यरत्न बियांची निवड केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन निश्चितच चांगले मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शंकरलिंग पीकेपीएसतर्फे शेतकरी सभासदांना सवलतीच्या दरात दिवरत्न सोयाबीन ३० किलोची बॅग (पिशवी) २९७० रुपयांत दिली जात आहे. शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकांने चांगला दर मिळवून दिल्यामुळे शेतकऱ्यांची खरीपात पहिली पसंत सोयाबीनच दिसताहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आतापासूनच वर्तविण्यात येत आहे.
Check Also
संकेश्वर : पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम भूसगोळ विजयी
Spread the love संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. …