सदलगा शहरातील प्रचार सभेत माननीय उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे मत
सदलगा : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिरोळच्या २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांसाठी २४ जुलै रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी काल सदलगा शहरातील महादेव मंदिराच्या अक्कमहादेवी कल्याण सभा मंडपात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांच्या समवेत प्रचार सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
उद्यान पंडित व क्षारपड मुक्तीचे जनक सन्माननीय गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या १६ अ वर्ग उत्पादक सभासद आणि २ महिला प्रतिनिधी अशा १८ उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन कालच्या सभेत करण्यात आले.
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील आणि सदलगा शहराचे सहकार महर्षी व श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण देसाई यांचेच पॅनल विजयी होण्यासाठी आणि प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सदलग्यातील बहुतांशी सर्व सभासदांनी एकमुखी आणि एकदिलाने पाठींबा व्यक्त केला. सदलग्यातील व सदलगा परिसरातील दत्त कारखान्याचे जे सभासद आहेत ते सभासद सदलग्यातील विविध संघ संस्थांचे ही सभासद, संचालकही आजच्या सभेच्या अध्यक्षपदी आणि सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सभासद बंधू भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत म्हणजे हे देखील आगामी निवडणुकीतील विजयाचे संकेत आजच स्पष्ट दिसत आहेत. असे आवर्जून व्यासपीठावरील वक्त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सदलगा व सदलगा परिसरातील सर्व सभासदांनी या प्रचार सभेत आपली उपस्थिती आवर्जून लावली होती. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील आणि उपाध्यक्ष अरुण देसाई यांच्या विश्वासार्हता, पारदर्शकता, आणि व्यवस्थापनावर व नेतृत्वावर इथल्या सभासदांचा असलेला दृढ विश्वास हेच वास्तव चित्र या उपस्थित सभासदांच्या गर्दीतून स्पष्ट दिसत होते.
उद्यान पंडित गणपतराव पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, दत्त कारखाना नेहमी शेतकऱ्यांच्या शेतीचा, त्यांच्या आरोग्याचा, त्यांच्या कुटुंबियांचा व मुलाबाळांच्या शैक्षणिक विकिसाचा, शेतीचा शास्त्रीय अभ्यास, शेतीतील मातीचे आरोग्य व निगा, विविध पिकांच्या लागवडी संबंधी मार्गदर्शन, क्षारपड जमिनीचा विकास अशा सर्वंकष बाबींच्या विकासासाठी कारखाना व्यवस्थापन सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. हा विकास असाच पुढे नेण्यासाठी आपल्या श्री दत्त शेतकरी विकास पॅनल च्या कपबशी या चिन्हावर सभासद बंधू भगिनीनी आपले बहुमोल असे मत द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सभेची सुरुवात मा. गणपतराव पाटील आणि उपस्थितीत इतर मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
अरुण देसाई यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर इतर मान्यवर वक्त्यांमध्ये ॲड. रमेश देसाई, डी. एस. पाटील, कल्लाप्पा कमते, प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्री. अण्णासाहेब कदम, पत्रकार श्री. मकरंद द्रविड, पिरगौडा पाटील, राजेंद्र प्रधान यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रचार सभेसाठी सदलगा पूर्व भाग सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, ॲड. रमेश देसाई, प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, अभिजित पाटील, डी. एस. पाटील, इंद्रजित पाटील, आदिनाथ गिजुने, संतोष नवले, पिरगोंड पाटील, उदयकुमार पाटील, सुमेरु पाटील, चेतन पाटील, मोहनराव शितोळे, राजेंद्र प्रधान इत्यादी मान्यवरांच्या सह सदलगा शहर आणि सदलगा परिसरातील मलिकवाड, वडगोल, बहिणाकवाडी, शमणेवाडी, बेडकिहाळ, आणि महाराष्ट्रातील कुरुंदवाड, मजरेवाडी, दत्तवाड, घोसरवाड, येथील सभासदही मोठ्या संख्येने उपस्थित होते.