
सदलगा : राघवेंद्र स्वामी आराधना हा १६व्या शतकातील आदरणीय संत आणि मध्वाचार्यांच्या द्वैत तत्त्वज्ञानाचे समर्थक श्रीगुरू राघवेंद्र स्वामी यांच्या भक्तांनी साजरा केलेला एक महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम आहे.
२०२४ मधील आराधना हा ३५३ वा आराधना महोत्सव झाला.
राघवेंद्र आराधना तीन दिवस म्हणजे मंगळवार, २० ऑगस्ट: पूर्वा आराधना बुधवार, २१ ऑगस्ट: मध्य आराधना गुरुवार, २२ ऑगस्ट: उत्तरा आराधना झाली.
श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी श्रावण कृष्ण द्वितीयेला दरवर्षी आराधना आयोजित केली जाते.
तीन दिवसीय आराधना महोत्सवात अष्टोत्तर अभिषेक, पालखी सेवा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झालू. जवळपासचे हजारो भक्त या कार्यक्रमात भाग घेऊन आणि श्री राघवेंद्र स्वामींकडून आशीर्वादही घेतला.
अंकली येथे श्री राघवेंद्र स्वामी मठाची स्थापना १९९७ साली झाली. तेव्हापासून दरवर्षी आराधनेशी संबंधित सर्व विधी व अष्टोत्तरी पाठ कार्यक्रम आयोजित केले जातात.
मध्य आराधना दिवशी गावातील सर्व लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते .
अरुण जोशी आणि श्रीगुरु राघवेंद्र समिती अंकलीचे सदस्य पपू किलीकट, शिरशेट, आर डी गिझरे, श्रीनिवास मुधोळकर, शेट्टी, रघुवीर यांच्यासह अनिल जोशी, गिरीश जोशी , गंगाधर जोशी, पवन जोशी, वरुण जोशी, मकरंद द्रविड, बाळकृष्ण जोशी उपस्थित होते.
अस्टोत्तर अभिषेकसाठी, अंकलीच्या जवळपासच्या गावचे भक्त मंडळी येऊन, महाप्रसाद व आशीर्वाद घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta