सदलगा : येथील कांहीं शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या उताऱ्यांवर वक्फच्या नोंदी अचानकपणे कर्नाटक सरकारकडून केल्या गेल्या असल्याचे आढळून आल्यानंतर तात्काळ पीडीत आणि इतर देखील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज उपतहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.
वक्फ हटाव – देश बचाव, अचानकपणे केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमीन उताऱ्यावरील वक्फच्या नोंदी हटवा, वक्फ मंत्री जमीर अहमदचा धिक्कार असो, कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा आणि फलक घेऊन शेतकऱ्यांनी राणी चन्नम्मा सर्कल पासून छ. शिवाजी महाराज चौकातून पुढे उपतहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेला. छ. शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी रिंगण करून दहा मिनिटे वाहतूक आडवली, शेतजमीन उताऱ्यावर जुलुमी वक्फ च्या नोंदी अचानकपणे करण्यात आल्या त्या हटविण्याची सरकारकडे विनंती करणाऱ्या आशयाची प्रकाश पाटील, राजू गौराजे, महादेव खोत, रामचंद्र रामनकट्टी, लक्ष्मीकांत हालप्पन्नवर आदींची भाषणे झाली. मोर्चाने घोषणाबाजी करत उपतहसीलदार पी. बी. शिरिवंत यांचेकडे उपतहसीलदार कार्यालयाच्या दारात सर्व शेतकऱ्यांनी शेतजमीनीवरील वक्फच्या नोंदी हटवून ज्यांचे त्यांचे उतारे पूर्ववत करावेत अशा आशयाचे निवेदन सादर केले, तसेच शेतकऱ्यांच्या नित्य गरजेच्या वस्तुंची जाण व्हावी म्हणून वक्फ मंत्री जमीर अहमद यांना कंदील, कुरी, कुदळ, नांगर, दुधाची किटली अशा प्रतिकात्मक वस्तू भेट म्हणून त्यांना पोचविण्यासाठी उपतहसीलदार पी. बी. शिरिवंत यांना दिले.
पिढ्यानपिढ्या ज्या जमिनीवर सदलग्यातील तसेच कर्नाटक राज्यातील कुटुंबांचा उदरनिर्वाह करत आहेत त्यांच्या न्याय्य हक्कांवर त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवरच, स्वमालकीच्या जमिनींवर घाला घालण्याचे काम सिद्धरामय्यांचे कर्नाटक सरकारने केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर अचानकपणे वक्फ बोर्डचा मालकी हक्क असल्याचा उल्लेख झाला असल्याने येथील पीडीत शेतकरी तसेच इतरही शेतकरी धास्तावले आहेत, हवालदिल झाले आहेत.
पीएसआय शिवकुमार बिरादर, एएसाय रमेश तळवार आणि इतर सदलगा पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. मोर्चा शांततेत घोषणाबाजी करत उपतहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला.
यावेळी प्रकाश जे. पाटील, अतिक्रांत पाटील, संजीव पाटील, रामचंद्र रामनकट्टी, अभिजीत पाटील, आनंद पाटील, रमेश माने, बाळासाहेब पाटील, संजय कोरे, सौ. वत्सला मिरजकर, सौ. आक्काताई जगताप, हेमंत शिंगे, दरेप्पा हवालदार, लक्ष्मीकांत हालप्पन्नवर, अभिनंदन पाटील, पद्माकर पाटील, महावीर महाजन, महादेव खोत, सचिन पाटील, बसवराज हणबर, राहुल पाटील, संजय कुलकर्णी, अनिरुद्ध पाटील, सुधीर मांगुरे, प्रशांत करंगळे, राजू अमृतसम्मान्नावर, कैलास माळगे, शिरीष अडके, रावसाहेब बनवण्णा, महादेव कोल्हापूरे, शांतीनाथ उगारे, चिदानंद मुतनाळे, अभय बदनीकाई, भरत बोरगावे, देवा तवनक्के, रोहित संभोजे, सुनिल पाटील-शिरगुप्पे, मयुर तवनक्के, शिवाजी संकपाळ, रवी डांगे, दिलीप हणबर, राकेश खोत, तात्यासाहेब निडगुंदे, रमेश लंगोटे, माणिक चंदगडे, महावीर हुद्दार, दादासाहेब कोगनोळे, चेतन मायप्पन्नवर, सचिन हंचनाळे, सुधीर भीमराई, मुकुंद मिरजकर, शिवानंद हालप्पनवर, मनोज प्रदीप चंदर – पाटील, बाबूराव इंगळे, राजू गौराजे, अजित तवनक्के, गिरीश अडके आणि असंख्य शेतकरी उपस्थित होते.