सदलगा : चिकोडी तालुक्यातील सदलगा येथील श्री साई सोशल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजातील उपेक्षित वर्गाच्या दैनंदिन जीवनातील गरजा लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने उघड्यावर झोपडीत राहणाऱ्या लहान बाळांना व स्त्री-पुरुषांना थंडीपासून संरक्षण मिळावे हा उदात्त हेतू ठेवून संस्थेचे संस्थापक माननीय श्री. महादेवराव भीमा मधाळे यांनी व त्यांच्या संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून बैलगाडीने ऊस तोडणाऱ्या सर्व ऊसतोड मजुरांना आज मोफत ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
सध्या थंडीचा मोसम जोरात सुरू असून ऊसतोड मजुरांच्या झोपडीमध्ये थंडीपासून संरक्षणाच्या दृष्टीने अंथरूण, पांघरूणाची कमतरता लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने संस्थेचे चेअरमन श्री. सुरज महादेव मधाळे सीईओ श्रुती कमते, संस्थेचे संचालक मंडळ संतोष वास्कर, सचिन खोत, श्रुती कुंभार, डॉक्टर सिद्धेश्वर भागाई, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, सुनील मगदूम, महेश गुरव, निवृत्ती शिंदे, कृष्णा पवार यांच्या हस्ते ऊसतोड मजूर लक्ष्मण बचकर, अरुण बचकर, दादा मांहानगुरे, भाऊसाहेब महानगुरे, बबन बचकर, संतोष थोरात, राजू केसरकर आणि उर्वरित सर्व बैलगाडीने वाहतूक करणाऱ्या ऊसतोड मजुरांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत बँकेचे वाटप करून सदलगा शहरातील श्री साई सोशल फाउंडेशन सदलगा यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. याचे सर्व शहरातून कौतुक केले जात आहे.