बेळगाव : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने बेळगाव जिल्ह्यातील पंत बाळेकुंद्री येथील एक तर चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी एक तसेच उडपी, बागटकोट येथील जवानासह पाच भारतीय जवान शहीद झाले.
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी गावातील धर्मराज सुभाष खोत हे शहीद झालेल्या सैनिकांपैकी एक असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव कर्मचाऱ्यांनी पाच मृत सैनिकांचे मृतदेह बाहेर काढले असून जखमींवर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.