बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात गेल्या १० दिवसांपूर्वी सुवर्णा मातय्या नावाच्या गर्भवती महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून प्रकरणाची अधिक चौकशी केली असता नवा ट्विस्ट समोर आला आहे. आपल्याच सासऱ्याने सुनेची हत्या केल्याचे समजते. आपय्या राचय्या मठपती असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सुवर्णा मातय्या नामक गर्भवती महिलेने आपल्या सासरच्या मंडळीना 50 हजार रुपये उसने दिले होते. महिलेची प्रसूतीची तारीख जवळ आल्याने दिलेली रक्कम परत मागितल्याने संतापलेल्या सासऱ्याने गर्भवती सुनेची चाकूने वार करून हत्या केली. त्याने केवळ हत्याच केली नाही तर महिलेच्या अंगावरील कपडेही फाडले आणि तेथून पळ काढला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलिसांनी आरोपी आपय्या राचय्या मठपतीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.