चिक्कोडी : सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने सोमवार तारीख ६ जानेवारी रोजी शमनेवाडी येथील अमृत गार्डन येथे पत्रकार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी मावळत्या अध्यक्षा लीना संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक सुभाष बदनीकाई, संतोष कामात, राजू कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत २०२५-२६ या वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची चर्चा झाली. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड (सदलगा) पुढारी, उपाध्यक्षपदी वैभव खोत, (गळतगा) पुढारी यांची तसेच कार्यवाहपदी अजित सुतार (मलिकवाड) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या प्रसंगी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह यांचा सत्कार सत्कार प्रमुख पाहुणे डॉ. गोपाळ महामुनी, बाळासाहेब शिंदे, उदय पांगिरे व विक्रम शिंगाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी नूतन अध्यक्ष मकरंद द्रविड म्हणाले, सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबून संघाच्या आभिवृद्धीसाठी सतत प्रयत्नशील राहीन. यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शामलिंग किल्लेदार, गजानन पाटील, विष्णू शिंगाडे, कुमार संकपाळ, तानाजी पवार, शिवाजी भोरे, अजित शिंदे, संजय कुलकर्णी, आण्णासाहेब कदम, अमर माने, तात्यासाहेब कामत, अनंत दीक्षित, अजित कांबळे, राजू संकपाळ, बाबासाहेब सदलगे, आदी उपस्थित होते. अजित कांबळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta