चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्य तेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर सर्वत्र आंदोलन होत आहेत.
आज चंदगड तालुक्यामधे चंदगड तालुका युवक काँग्रेसकडून तहसील कार्यालय ते पेट्रोलियमपर्यंत सायकल रॅली काढत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व तालुका कॉंग्रेस कमिटी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.