नड्डांच्या वक्तव्यामुळे येडियुराप्पांच्या ‘सेफ’ची चर्चा
बंगळूर : एकिकडे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या राजीनाम्याची क्षणगणना सुरू असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यात बोलताना येडियुराप्पा यांच्या कार्याचे कौतुक करून नेतृत्व बदलाचा प्रश्नच उत्पन्न होत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येडियुराप्पा जाणार कि राहणार? याविषयीचे गुढ कायम आहे.
रविवारी (ता. 25) हायकमांडकडून एक संदेश येणार असून मुख्यमंत्री येडियुराप्पांचा राजीनामा निश्चित असल्याची राजकीय वर्तळात जोरदार चर्चा हाती. स्वत: येडियुराप्पा यांनी हायकमांडच्या निर्णयाचे पालन करण्यास वचनबद्ध असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पुढचे मुख्यमंत्री कोण, यावरही जोरदार चर्चा आहे.
रविवारी सायंकाळी उशीरापर्यंत हायकमांडकडून येडियुराप्पांना कोणताच संदेश आला नाही. त्यामुळे तो उद्या (ता. 26) मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच पणजीत बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कर्नाटकातील नेतृत्व बदल फेटाळून लावला. आश्चर्याची बाब म्हणजे नड्डा यांनी येडियुराप्पा यांच्या कार्याचा गौरव केला, त्यामुळे नेतृत्व बदलावर पुन्हा साशंकता व्यक्त होत आहे. येडियुराप्पा ‘सेफ’ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कर्नाटकात कोणतेही राजकीय संकट नाही. येडियुराप्पा उत्तम काम करत आहेत. कर्नाटकात त्यांनी दोन वर्षे सुशासन दिले आहे. त्यांना बदलण्यात येणार असल्याचे कोणीही, कधीही वक्तव्य केलेले नाही असे नड्डा यांनी सांगितल्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. येडियुराप्पा विरोधकांना त्यामुळे मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा नेतृत्व प्रकरणासंदर्भात हायकमांडच्या संदेशाची वाट पहात आहेत. त्यातच आता, नड्डा यांच्या विधानानुसार राज्यातील नेतृत्व बदलाचा गोंधळ कायम राहणार आहे. येडियुराप्पा उर्वरित दोन वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहतील, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
उद्या (ता. 26) येडियुराप्पा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा असतानाच ते उत्तर कन्नड (कारवार) जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पहाणी करण्याच्या दौर्यावर जाणार आहेत. राजीनामा देण्यासाठी कांही तास बाकी असतानाच येडियुराप्पांच्या बिनधास्त वागण्यामुळे ते मुख्यमंत्री पदावर कायम रहाणार असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
आज दुपारनंतर स्थिती स्पष्ट
उद्या (ता. 26) मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून त्यानंतर येडियुराप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, असा सूत्रांचा दावा आहे. परंतु येडियुराप्पा राहणार कि जाणार हे दुपारी तीन नंतर स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Check Also
शिक्षण मंत्र्यांनाच येत नाही कन्नड
Spread the loveविद्यार्थ्याच्या शेऱ्यांने मंत्री झाले संतप्त; कारवाईचा दिला आदेश बंगळूर : व्हिडिओ कॉन्फरन्स संभाषणात …