बेंगळूर : राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेविषयी मुख्यमंत्री येडियुराप्पांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी राज्यात कोविड -१९ वर नियंत्रण ठेवणे आणि लोकांचे हित जपणे हे माझे एकमेव लक्ष आहे, असे सांगितले. दरम्यान, राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.
“मुख्यमंत्र्यांनी कोविड, त्यावर नियंत्रण ठेवणे आणि लोकांचे हित जपणे ही माझी प्राथमिकता आहे. जर कोणी नेतृत्व बदलाविषयी कुठेतरी गेले असतील (दिल्लीतील काही आमदार हायकमांडला भेटायला गेले असतील) तर त्यांना योग्य उत्तरे दिली गेली आहेत आणि हाय कमांड द्वारा परत पाठवले आहे, ” असे येडियुरप्पा म्हणाले.
बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कोरोनामुळे लोक संकटात सापडले आहेत आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, तेव्हा त्यावर एकत्रितपणे नियंत्रण ठेवणे हे आमदार, मंत्री आणि सर्वांचे प्राधान्य असले पाहिजे. कोरोना नियंत्रित ठेवण्याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, माझ्यासमोर इतर काही बाब नाही, कोविडला तोंड देणे ही माझे प्रथम प्राधान्य आहे,” असे ते पुढे म्हणाले.