Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक: खासगी रुग्णालयांनी लसीकरण सेवा शुल्कात वाढ करण्याची केली मागणी

Spread the love

बेंगळूर : राज्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु आहे. शासनाच्या लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण सुरु असून खासगी रुग्णालयांमध्ये शुल्क आकारून लसीकरण केलं जात आहे. दरम्यान, कर्नाटकमधील खासगी रुग्णालयात लसीकरणाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून खासगी रुग्णालयांनी मात्र लसीकरणाच्या सेवा शुल्कात वाढ करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान कोल्ड चेन, स्टोरेज आणि लॉजिस्टिकिकल गरजा इतरांकरिता गुंतवणूकीसाठी “मोठा खर्च” असल्याचे सांगून सेवा शुल्क १०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवावे अशी खासगी हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम असोसिएशनची इच्छा आहे.

कोविड टास्क फोर्स आणि अतिरिक्त मुख्य सचिवांना (आरोग्य) लिहलेल्या पत्रांमध्ये डॉक्टरांनी नमूद केले आहे की उत्पादकांकडून लसींची थेट खरेदी करण्यासाठी सरकारला जे पैसे दिले जात होते त्यापेक्षा जवळपास चार ते आठ पट जास्त खर्च येतो.

About Belgaum Varta

Check Also

गणेशमूर्ती प्रतिष्ठानपणा मिरवणुकीत महिलांशी गैरवर्तन; हुबळीमध्ये तणाव

Spread the love    महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून गुन्हा दाखल; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध हुबळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *