तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ओलम अग्रो इंडिया प्रा. लि. राजगोळीकडून खु. ता. चंदगड, या कारखान्यामार्फत चंदगड तालुक्याच्या कोरोना बाधित रूग्णांसाठी 10 लिटरची तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आली.
ओलम साखर कारखाना आपत्ती काळात नेहमीच शेतकर्यांच्या पाठीशी राहतो. यामुळेच कोविडसारख्या या कठीण परिस्थितीत कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देवून सामाजिक दातृत्व स्विकारले.
यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील, चंदगड तहसिलदार विनोद रणावरे, आरोग्य अधिकारी श्री. खोत, ओलम कारखान्यामार्फत बिझनेस हेड भरत कुंडल, मुख्य शेती अधिकारी सुधिर पाटील, एच. आर. अजिज झुंनझानी, अनिल पाटील, नामदेव पाटील, रमेश पाटील, गणपत पाटील, दयानंद देवण आदि आधिकारी उपस्थित होते.
Check Also
राजकोट येथील शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात
Spread the love कोल्हापूर : सिंधुदुर्गमधील पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात …