Saturday , July 27 2024
Breaking News

पालिका सफाई कर्मचार्‍यांचे कर्तव्य सुरूच!

Spread the love

’कोरोना’च्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे काम : दररोज 13 टन कचर्‍याची उचल
निपाणी : गेल्या महिन्यापासून सर्वत्र कोरोनाच्या  संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशाबरोबर कर्नाटकातही या रोगाचे रुग्ण चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निपाणीतही लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली असून सर्वांना घरी बसण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडून येथील नगरपालिका कर्मचारी मात्र दिवस-रात्र शहरातील स्वच्छतेचे काम करीत आहेत. धोक्याच्या दिवसातही पालिका सफाई कर्मचार्‍यांचे कर्तव्य सुरू असून दररोज 13 टन ओला आणि सुका कचर्‍याची उचल केली जात आहे. त्यामुळे निपाणी शहरवासीयांना विविध रोगापासून मुक्ती मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यू आणि संचार बंदी होण्यापूर्वीच निपाणी नगरपालिकेचे सफाई कामगार कर्तव्यावर हजर झाले आहेत. दिलेल्या विभागात त्यांनी चोखपणे साफसफाई सुरू केली आहे. गेल्या महिन्यापासून निरंतरपणे त्यांचे हे कार्य सुरू आहे. शहरातील 31 प्रभागांमध्ये दररोज दिवसभर तुंबलेल्या गटारी स्वच्छ करणे, घराघरातील कचरा उचलणे, रस्त्यावरील स्वच्छता करणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता अशी कामे केली जात आहेत. याशिवाय कोरोना सह इतर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील सर्वच प्रभाग आणि उपनगरांमध्ये औषध फवारणी पूर्ण झाली आहे. स्वच्छतेचे सह फवारणीच्या कामासाठी नगर पालिका आयुक्तांसह 3 अधिकारी, 4 मुकादम आणि 30 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: नगरपालिका आयुक्त महावीर बोरण्णावर व त्यांचे सहकारी दिवस-रात्र कष्ट घेत आहेत.
स्वच्छतेच्या काळात कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारची आरोग्याची समस्या न जाणवण्यासाठी त्यांना गमबूट, मास्क, हातमोजे, टोप्या, सॅनिटायझर आणि इतर साहित्य दिले जात आहे. दैनंदिन स्वच्छतेबरोबरच रात्रीच्यावेळी फॉगिंग मशीनने डास प्रतिबंधक औषध फवारणी केली जात आहे.
त्यामुळे निपाणीकर आणि आतापर्यंत आलेली विविध संकटे पार केली आहेत. कोरोनाचाही अशाच प्रकारे सामना करण्यासाठी शहरवासीयासह नगरपालिका आणि आरोग्य विभाग सरसावली आहे.
एकंदरीत शहरवासीय घरात असताना नगरपालिकेतील अधिकारी आणि स्वच्छता कामगार मात्र आपले कर्तव्य समजून शहराच्या स्वच्छतेमध्ये गुंतले आहेत.
——
स्वच्छता कामगारांमुळे शहराचे आरोग्य सुरक्षित
शहरवासीयांच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस काम करणार्‍या नगरपालिकेतील कंत्राटी काही सफाई कर्मचारी असून त्यांना तीन चार महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. त्यांच्यामुळेच शहरवासीयांचे आरोग्य सुरक्षित आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ वेतन देण्याची गरज आहे.

’कोरोना या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार शहरात स्वच्छता मोहीम आणि औषध फवारणी निरंतरपणे सुरू आहे. त्यामध्ये आरोग्य विभागासह स्वच्छता कामगारांची योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी शहरवासीयांनी घरातील ओला आणि सुका कचरा रस्त्यावर टाकता घंटागाडीला देणे आवश्यक आहे.’
– महावीर बोरण्णावर, नगरपालिका आयुक्त, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

Spread the love  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *