बेळगाव : यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात दीड किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणी किंगपिन किरण वीरन गौडर याला चौथ्या जेएमएफसीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या प्रांगणातील कारच्या एअरबॅगमध्ये ठेवण्यात आलेले ४.९ किलो सोने चोरीच्या प्रकरणात डील केलेल्या किंगपिन किरण वीरन गौडर याने सोने ठेवलेली कार सोडवण्यासाठी २५ लाखांची मागणी केली होती. मंगळूर येथील असणारा कार मालक टिळक पुजारी यांच्याकडून पैसे घेतल्याच्या आरोपावरुन सीआयडी अधिकाऱ्यांनी किरणला ताब्यात घेऊन त्याची १४ दिवस चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा १० दिवस चौकशी करण्यात आली. यानंतर किरणने जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन बेळगावच्या चौथ्या जेएमएफसी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला.