Tuesday , March 3 2026
Breaking News

चोरी प्रकरणी एकाला अटक : साडेतीन लाख रुपयाचे सोने जप्त

Spread the love

बेळगाव : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळविताना पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडील सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे 70 ग्रॅम सोने जप्त केले.

परशराम इराप्पा दंडगल (वय 32, रा. गुरुदेव गल्ली) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या परशराम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे चोरी केलेल्या ऐवजाची माहिती दिली. तेंव्हा पोलिसांनी त्याने चोरी केलेले सुमारे 3.36 लाख रुपये किंमतीचे 70 ग्रॅम सोने जप्त केले. सदर कारवाईची प्रशंसा करून पोलीस आयुक्तांनी शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना शाब्बासकी दिली आहे.
शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यु. टी. पाटील, एस. एम. कांबळे, एस. एस. उळेगड्डी आदींचा उपरोक्त कारवाईत सहभाग होता.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *