माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नांना परिषदेने फोडली वाचा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत चंदगड तालूक्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून सर्व कामकाज केले.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जूनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेत्तर कर्मचारी भरती, कोरोना कामगिरीवर असताना विमा सरंक्षण, विना अनुदान शाळांना अनुदान मिळणे, संगणक शिक्षकांना सेवेत सामावून घेणे, ग्रंथपालांच्या मागण्या, सातवा वेतन आयोग थकलेला हप्ता देणे, अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता, कॅशलेश व आरोग्य विमा लागू करणे इ.३२ मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत चंदगड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सौ. सुमन सुभेदार यांच्याकडे दिले. माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न परिषदेमार्फत पोटतिडकीने मांडण्यात आले.आजच्या आंदोलनाला तालुक्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, प्राचार्य आर. आय. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष टी. एल. तेरणीकर, परिषदेचे अध्यक्ष टी. टी. बेरडे, उपाध्यक्ष मनोहर भुजबळ, सचिव संजय साबळे, खजिनदार पी. वाय. पाटील, सुभाष बांदिवडेकर उपस्थित होते.