Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

राकसकोप जलाशय लवकरच भरणार; चार फूट पाण्याची आवश्यकता

  बेळगाव : गेल्या आठवडाभरापासून पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने बेळगावनगरीतील नागरिकांना समाधान होत आहे. बेळगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेले राकसकोप जलाशय लवकरच भरणार आहे. 0.60 टीएमसी क्षमतेच्या जलाशयाची एकूण उंची 2475 फूट आहे. आजची पाण्याची पातळी 2471.4 फूट …

Read More »

अनमोड घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

  खानापूर : बेळगाव लगतच्या महाराष्ट्र, गोवा आणि बेळगावच्या सीमेवर मुसळधार पाऊस पडत आहे. बेळगाव-पणजी मार्गावरील अनमोड घाटात दूधसागर देवस्थान नजीक आज पहाटे दरड कोसळली असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे. लवकरच रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात येईल. दरड कोसळत असल्याने या घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी …

Read More »

खासगी नोकऱ्यांमध्ये कन्नडिगांना १०० टक्के आरक्षण लागू करण्याबाबतच्या विधेयकाला कर्नाटक सरकारची स्थगिती

  बंगळुरू : राज्य मंत्रिमंडळाने कन्नडिगांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली होती. मात्र कर्नाटक सकारने आपला निर्णय आता मागे घेतला आहे. सिद्धरामय्या सरकारने त्यांच्याच निर्णयावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे खासगी नोकऱ्यांमध्ये कानडी लोकांना आता आरक्षण मिळणार नाही किंवा त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागू शकते. कर्नाटकमधील काँग्रेस …

Read More »