Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आम. विठ्ठल हलगेकर यांचा सन्मान

  खानापूर : कर्नाटक राज सीनियर सिटीजन असोसिएशन खानापूर घटक च्या वतीने सोमवारी खानापूरचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचा श्रीफळ शाला देऊन सन्मान कार्यक्रम येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीनियर सिटीजन असोसिएशनचे अध्यक्ष बनोशी सर होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संघटनेचे ज्येष्ठ सभासद लक्ष्मण पाटील यांनी केले. व …

Read More »

6 लाखाच्या गांजासह दोन आरोपींना अटक

  संकेश्वर : हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोल नाक्याजवळील हंचीनाळ गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे गांजा विक्री करताना महाराष्ट्रातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. बेळगाव डीसीआरबी शाखेचे डीएसपी विरेश दोडमनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्टेशन बेळगावचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व बेळगाव डीसीआरबी शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांना …

Read More »

ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा समितीची आज बैठक

  बेळगाव : ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा समितीची बैठक मंगळवार दि. १३ जून रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. गिरीश काँप्लेक्स, कार पार्किंग एरिया, रामदेव गल्ली, बेळगाव येथे ही बैठक होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.

Read More »