Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; वडगाव भागात पूरस्थिती!

बेळगाव : बेळगावात पावसाने थैमान घातले आहे. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव परिसरात मागील 15 दिवसांपासून पावसाची संततधार चालूच आहे. मात्र गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. वडगावमधील अन्नपूर्णेश्वरी नगर, केशवनगर, साई कॉलनीचा काही भाग पाण्याखाली गेला आहे. अन्नपूर्णेश्वरी नगर सहावा …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावरील बुरुज कोसळला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था सुरुच आहे. पन्हाळगडावरील बुरुजांची घसरण सुरूच असताना आता विशालगड किल्ल्यावर देखील असाच प्रकार आढळून आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याचा आज बुरुज ढासळला आहे. सुदैवाने पर्यटक गडावर नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गडावर जाण्यासाठी असलेल्या …

Read More »

हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारूती मंदिर पाण्याखाली

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूती मंदिर गेल्या आठवड्यापासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याचा साठा वाढल्याने मंदिर पाण्याखाली गेले आहे. मलप्रभा नदीच्या पात्रात असलेल्या स्वयंभू मारूती मंदिराच्या स्लॅब बुडला आहे. नदीच्या पात्रात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत …

Read More »