Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सोयाबीन दर घसरणीच्या विरोधार्थ बैलहोंगलमध्ये जेडीएसची निदर्शने

बैलहोंगल : सोयाबीनचे दर जलदगतीने घसरत चालले आहेत. याविरोधात आज बैलहोंगल येथे राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधार्थ निषेध करत जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. बैलहोंगल शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून निषेध मोर्चा काढण्यात आला. जेडीएसचे बैलहोंगल जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

खानापूरात पीडब्ल्यूडी खात्याकडून गाळे काढले, आमदारांची सुचना डावलली

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी वर्गणी काढून 51 गाळे आमदारांच्या सांगण्यावरून उभारण्यात आले होते. मात्र महिन्यातच गाळे काढण्यासाठी पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी व त्यांचे सहाय्यक अभियंते सोमवारी जेसीबी घेऊन गाळे काढण्यासाठी आले. यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर तसेच माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारक पीडब्ल्यूडी …

Read More »

कॅन्टोन्मेंट बैठक : ऑनलाईन बिलात 5 टक्के सवलत

बेळगाव : शंभर टक्के महसूल वसुलीसाठी ऑनलाईन बिल भरणा करणार्‍या नागरिकांना बिलात 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर रोहित चौधरी हे होते. कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात काल गुरुवारी झालेल्या या बैठकीच्या प्रारंभी दिवंगत केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांना …

Read More »