खानापूर (प्रतिनिधी) : सालाबाद प्रमाणे होणारी गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्रीमाऊली देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत होती.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षीही सरकारच्या नियमाचे पालन करत माऊली यात्रा पार पडली.
यावर्षीही मे महिन्यात होणारी यात्रा कोरोनाच्या महामारीमुळे जून महिन्याच्या मंगळवारी दि. २९ व बुधवारी दि. ३० रोजी माऊली मंदिरात साधेपणाने व विधीवत पुजा होऊन पार पडली.
बुधवारी पहाटे देवीची महापूजा, आरती, पंच मंडळी, मानकरी व ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत सरकारच्या नियमाचे पालन करत पार पाडली.
तसेच भाविकांनी माऊली देवीचे नियमाचे पालन करत यात्रा साजरी केली.
Belgaum Varta Belgaum Varta