बेळगाव : एलआयसीकडून हालगा गावासाठी ₹ 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली. बेळगाव येथील एलआयसी कार्यालयात हा कार्यक्रम नुकताच झाला. एलआयसी मुख्य मॅनेजर अंजलीना जकलीस, एवि एम. एस. कुठोले, विकास अधिकारी एच. आर. प्रसाद, एलआयसी एजंट वासु सामजी यांच्याकडून हालगा ग्रामपंचायत सदस्य सदानंद बिळगोजी, सागर कामाणाचे यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी विमा प्रतिनिधी गंगाराम पावटे उपस्थित होते. हा निधी मंजुर करण्यासाठी हालगा येथील विमा प्रतिनिधी आणि समितीचे कार्यकर्ते वासू सामजी यांनी विशेष परिश्रम घेतले. या निधीतून हालगामध्ये सोलार दिवे उभारण्यात येणार आहे. या निधी मंजूर करुन आणल्याबद्दल वासू सामजी यांचे कौतुक करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta