बेंगळुरू : कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही, असं मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. कोणत्याही धर्माच्या प्रमुखांनी, धर्माच्या कीर्तनकार किंवा प्रवचनकारांनी दुसऱ्या कोणत्याही धर्मांची अवहेलना करु नये असं न्यायमूर्ती एच. पी. संदेश यांनी सांगितलं. दरम्यान आपल्या धर्माबद्दल सांगत असताना इतर धर्मांचा अपमान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांनी फौजदारी रद्द करण्याची मागणी केली होती. यावर सुनावणी झाली असता न्यायमूर्तींनी तक्रार रद्द करण्यास नकार दिला.
दरम्यान, न्यायमूर्तींनी दोन ख्रिश्चन व्यक्तींविरोधातली अन्य धर्मांची बदनामी केल्याची फौजदारी तक्रार रद्द करण्यास नकार दिला आहे. कोणत्याही धर्माला इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार दिलेला नाही. आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की कोणत्याही धर्माची बाजू घेत असताना, त्या धर्मप्रमुखांनी किंवा धर्माबद्दल भाष्य करणाऱ्या व्यक्तींनी इतर धर्मांची बदनामी करु नये, कोणत्याही धर्माला कमी लेखू नये असं न्यायालयाने म्हटलं आहे.
एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर न्यायालयात हा खटला सुरु होता. या महिलेची अशी तक्रा होती की, आरोपी महिलेच्या घरी आले आणि त्यांनी तिला आपल्या धर्माबद्दल सांगण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी त्या महिलेला तर धर्म आपल्या धर्माप्रमाणे महान नाहीत अशा पद्धतीने तिला पटवून देण्याची सुरुवात केली. त्या दोन व्यक्तींनी भगवद् गीता आणि कुराणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे या महिलेने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta