बेळगाव : हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रविवार 13 जूनपासून पुढील 8 दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार 19 जूनपर्यंत लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने सुध्दा बंद राहणार आहेत. हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व गावात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या नियमानुसार आणि जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ, पोलिस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या आदेशानूसार संपूर्ण 8 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय हिंडलगा ग्रामपंचायतने घेतला आहे.
गेल्या महिन्याभरात हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी संपूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये शंभरहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर काही रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta