Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

अलारवाड क्रॉसजवळ विद्युत खांब शेतात पडून; हेस्कॉमचे दुर्लक्ष

  बेळगाव : सततच्या पावसामुळे अलारवाड क्रॉस येथील रस्त्याशेजारी शेतवडीत चार-पाच विजेचे खांब गेल्या चार दिवसापासून उन्हाळून पडलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी हेस्कॉमकडे रीतसर तक्रार करून देखील ते विद्युत खांब हटविण्यात आलेले नाहीत त्यामुळे जीवितहानी झाल्यानंतरच हेस्कॉमला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल या भागातील शेतकरी विचारत आहेत. मागील चार …

Read More »

निपाणीकरांच्या आरोग्यासाठी प्रयत्नशील!

  आमदार शशिकला जोल्ले : ‘आमचा दवाखान्याचे’ उद्घाटन निपाणी (वार्ता) : मागासवर्गीय भागात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ‘आमचा दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच त्याचा उपयोग होणार असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे. यापूर्वी अर्बन हेल्थ सेंटर सुरू करून आरोग्य सुविधा दिल्या आहेत. …

Read More »

पावसामुळे लोंढा मार्गावर मोहिशेतनजीक नव्याने बांधलेला ब्रिज खचला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा येथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे लोंढ्यातील वीज प्रवाह खंडित झालेला आहे. त्याशिवाय लोंढा मार्गावर मोहिशेतनजीक नव्याने बांधलेला ब्रिज खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे लोंढा गावातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. …

Read More »

पावसाळ्यात राहा सर्पांपासून सावधान!

  निपाणी तालुक्यात विषारी चार जाती : मारण्याऐवजी सर्पमित्रांना द्या माहिती निपाणी (वार्ता) : पावसाळी दिवसात बिळात पाणी भरत असल्याने सर्प बाहेर पडतात. अशावेळी सर्प विषारी असो की बिनविषारी तो दिसताच नागरिक भयभीत होतात. यामुळे या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगत विषारी आणि बिनविषारी सर्पांची माहिती घेण्याची गरज निपाणी परिसरातील सर्पमित्रांनी …

Read More »

अतिवृष्टीमुळे बैलहोंगल तालुक्यात 3 घरांची पडझड; 13 जण जखमी

  बेळगाव : बेळगावभर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बैलहोंगल तालुक्यातील बुदरकट्टी गावात तीन घरांची पडझड झाली असून 13 जण जखमी झाले आहेत. एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाली असून जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इरय्या पत्रायणवर, शंकरप्पा आणि बसवण्णा यांची …

Read More »

खासगी बस पलटी; चालकाचा जागीच मृत्यू

  25 प्रवासी जखमी यल्लापूर : उत्तरा कन्नड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 63 वर भीषण अपघात झाला. खासगी बस पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. बेंगळुरूहून गोव्याकडे जाणाऱ्या एका खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील …

Read More »

दि. बेळगांव बेकर्स सोसायटीच्या चेअरमनपदी राजाराम सूर्यवंशी तर व्हा. चेअरमनपदी सुरेखा मेलगे

  बेळगांव : येथील सहकार क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी संस्था दि. बेळगांव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. राजाराम जयवंत सूर्यवंशी व व्हाईस चेअरमनपदी सौ. सुरेखा परशराम मेलगे यांची एकमताने निवड करण्यात आली. ताशिलदार गल्ली येथील संस्थेच्या सभागृहात झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत निवडणूक अधिकारी श्री. एन. एल. हुलकुंद यांनी निवडणूक …

Read More »

गर्लगुंजी प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या निवडणुकीत श्री माऊलीदेवी शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील तालुक्यातील सर्वात जुनी पीकेएस सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीची खानापूर तालुक्यात चुरशीची निवडणूक म्हणून सर्वाचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत दोन पॅनल तयार झाले होते. यामध्ये जुने संचालक असलेले पॅनल श्री माऊली देवी शेतकरी विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनल …

Read More »

वेस्ट इंडिजकडून दमदार प्रत्युत्तर, भारताकडे अद्याप 352 धावांची आघाडी

  पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने 438 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजनेही दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने एक बाद 86 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने दमदार फलंदाजी केली. भारताकडे अद्याप 352 धावांची आघाडी …

Read More »

येळ्ळूर येथे सापडले स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक!

  बेळगाव : येळ्ळूर येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याने येळ्ळूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती समजतात रात्री उशिरा पोलिसांनी ते अर्भक ताब्यात घेऊन पुढील तपास चालू केला आहे. या घटनेमुळे येळ्ळूर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे चांगळेश्वरी गल्ली येथील संभाजी पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस …

Read More »