Monday , September 21 2026
Breaking News

पावसामुळे लोंढा मार्गावर मोहिशेतनजीक नव्याने बांधलेला ब्रिज खचला

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा येथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे लोंढ्यातील वीज प्रवाह खंडित झालेला आहे. त्याशिवाय लोंढा मार्गावर मोहिशेतनजीक नव्याने बांधलेला ब्रिज खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे लोंढा गावातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. गावात वीज नसल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. पावसामुळे उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नद्या आता तुडुंब भरून वाहत आहेत. खानापूर-लोंढा मार्गावरील मोहिशेतनजीक नव्याने बांधण्यात आलेल्या हायवे ब्रिज खचला आहे. रस्त्याच्या शेजारील माती या पावसामुळे ढासळून जात आहे रस्त्याच्या मधोमध भूकंपासारखे तडे गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूकंपासारखे तडे गेल्याने या मार्गावर जाणाऱ्या गाड्या पर्यायी मार्गाने सोडण्यात येत आहेत. लोंढ्यातील पांढरी नदी तुडुंब भरून वाहत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *