Saturday , June 6 2026
Breaking News

दि. बेळगांव बेकर्स सोसायटीच्या चेअरमनपदी राजाराम सूर्यवंशी तर व्हा. चेअरमनपदी सुरेखा मेलगे

Spread the love

 

बेळगांव : येथील सहकार क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी संस्था दि. बेळगांव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. राजाराम जयवंत सूर्यवंशी व व्हाईस चेअरमनपदी सौ. सुरेखा परशराम मेलगे यांची एकमताने निवड करण्यात आली.

ताशिलदार गल्ली येथील संस्थेच्या सभागृहात झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत निवडणूक अधिकारी श्री. एन. एल. हुलकुंद यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची नांवे जाहीर केली.

प्रारंभी सोसायटीचे सेक्रेटरी श्री. सागर शहापूरकर यांनी सर्वांचे स्वागत करून नूतन संचालकांचे अभिनंदन केले. त्यानंतर मावळते चेअरमन शिवाजी हंगीरकर यांनी नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. नूतन चेअरमन राजाराम सूर्यवंशी यांनी मागील काळात चेअरमन म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल हंगीरकर यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

याप्रसंगी शिवाजी हंगीरकर, सोसायटीचे सल्लागार मराठा बँकचे संचालक विनोद हंगीरकर, माजी चेअरमन शिवाजीराव जाधव, संचालिका श्रीमती कल्पना पावशे आणि सोसायटीचे सल्लागार माजी नगरसेवक नेताजी जाधव यांची शुभेच्छापर भाषणे झाली. तसेच सूर्यवंशी व मेलगे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक विजय पाटील, शंकर पाटील, शंकर गडकरी, गजानन बसरीकट्टी, श्रीमती रेखा कणबरकर व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. माजी सेक्रेटरी विनायक सायने यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *