Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

विधानसौधमध्ये अनधिकृतपणे पैशांची वाहतूक

  एकाला अटक; शिवकुमारांची चौकशीची मागणी बंगळूर : विधानसौधमध्ये अवैधरित्या पैसे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत सुमारे दहा लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. …

Read More »

येळ्ळूर येथील भाविकांसाठी केले सामाजिक कार्यकर्त्यांनी जमिनीचे सपाटीकरण

  बेळगाव : सौंदत्ती श्री यल्लमा देवी यात्रा आटोपून येळ्ळूरला परतणाऱ्या भाविकांचा पडल्या भरणे कार्यक्रम सुरळीत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने यल्लाप्पा पाटील व त्यांचे मित्र प्रशांत नंदीहळ्ळी यांनी गावच्या थडे देवस्थान जवळील जमिनीचे स्वखर्चाने सपाटीकरण व स्वच्छता केली आहे. सालाबाद प्रमाणे येळ्ळूर गावचे सर्व भाविक सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थानला …

Read More »

एमईए संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : “चांगला शिक्षक शिकवितो पण उत्कृष्ट गुरु प्रेरणा देतो आणि घडवितो. अशीच उत्कृष्ट गुरुची भूमिका एमईए या इंग्रजी संभाषण कौशल्य शिकविणाऱ्या संस्थेचे संचालक राजशेखर कोळीमठ पार पाडत असून त्यांनी आजतागायत तब्बल पन्नास हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण कौशल्याचे धडे देऊन घडविले आहे, ही प्रशंसनीय बाब असल्याचे लिंगराज महाविद्यालयाच्या इंग्रजी …

Read More »

सरकारी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

  येळ्ळूर : सरकारी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे 03/1/2023 रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रसिका रवींद्र धामणेकर उपाध्यक्षा एसडीएमसी एमएचपीएस येळ्ळूर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. दीपप्रज्वलन प्रसिद्ध कायदे सल्लागार श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी, सौ. राजकुंवर तानाजी पावले, सौ. वीणा सतीश पाटील, …

Read More »

गुणात्मक शिक्षण, आरोग्य सेवेवर भर

डॉ. प्रभाकर कोरे : निपाणीत मोफत महाआरोग्य शिबिर निपाणी(वार्ता): केएलई संस्थेने शिक्षणाबरोबरच आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वसामान्यांसाठी सर्व सोयीनियुक्त रुग्णालय उभारले आहे. त्यामध्ये दररोज हजारो रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या ४ हजार बेडचे रुग्णालय सुरू असून भविष्यात ७ हजार बेडचे रुग्णालय करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच या ठिकाणी कॅन्सरच्या हॉस्पिटल उभारून …

Read More »

गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वेशभूषा, सामान्य ज्ञान स्पर्धा

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.  यावेळी वेशभूषा स्पर्धा, चक्रव्यूह प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान, गणित विषयावरील रांगोळी स्पर्धा आणि विज्ञान प्रतिकृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमास संस्थेचे …

Read More »

हत्तरगीत बर्निंग बसचा थरार

  हत्तरगी : सरकारी बस मध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेळगाव कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी जवळ गुरुवारी सायंकाळी चारच्या दरम्यान ही घटना घडली. अचानक बसला शॉर्ट सर्किट होऊन महामार्गावर राज्य परिवहन विभागाच्या बसला आग लागली त्यामुळे हायवेवर मोठ्या प्रमाणात …

Read More »

2-डी नको, 2-ए च पाहिजे, लढा सुरूच राहणार : बसवजय मृत्युंजय स्वामीजी

  बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आईची शपथ घेत 29 डिसेंबर रोजी पंचमसालीना आरक्षणाची घोषणा केली. पण त्यांनी आम्हाला अपेक्षित आरक्षण दिले नाही. पंचमसाली समाज हे 2 डी आरक्षण नाकारतो असे सांगत 2 ए आरक्षणासाठीचा आमचा लढा सुरूच राहील असे कुडलसंगमपिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. …

Read More »

साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलवावी

  स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तहसिलदारना निवेदन चंदगड : चंदगड तालुक्यात ओलम शुगर, अथर्व दौलत, इको केन हे तीन साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. दरवर्षीचा अनुभव पाहता जानेवारीच्या महिनाच्या सुरवातीला चाळीस ते पन्नास टक्के ऊस तोड झाली पाहिजे. यावर्षी चंदगड तालुक्यात अनेक गावामध्ये शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये उभा आहे. मग तिन्ही …

Read More »

खानापूर शहरातील कामे न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मुख्यमंत्री अमृत नगरोत्थान योजनेंतर्गत नगर विकास टप्पा चार मधील रस्ते व गटारीची कामे सुरू करण्यास विलंब लावणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच ही कामे त्वरीत सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचातीचे नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी नगरविकास खात्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे नुकतीच करण्यात आली. निवेदनात …

Read More »