निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी वेशभूषा स्पर्धा, चक्रव्यूह प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान, गणित विषयावरील रांगोळी स्पर्धा आणि विज्ञान प्रतिकृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये केवल परदेशी, प्रांजल मगदूम, जिजा पाटील, हर्षल मगदूम, शार्दुल नरे, श्रावणी पाटील, स्वरा नागव, करण पाटील सई पाटील, नंदिनी खोत, त्रिशा नेसरे, अद्यंत स्वामी, देव पाटील, नुमान शहा, श्रेयस घाडगे, स्वयंम रांगोळे, केवल पटेल, शितल वट्टकी, अर्णव चव्हाण, रुद्र चौगुले, अदिती हलभावी, प्रणव पाटील, विवेक इंगळे, सौमिल नांगनूरे, प्रीती गोरवाडे, रितेश पाटील, विश्वजीत पुजारी, सर्वेश खोत, शंतनू फुटाणे, संस्कृती प्रताप, हर्षा टिंगरे, कशिश पटेल, मंजुश्री संकपाळ, समर्थ मोकाशी, ऋतुजा निंबाळकर, अनुष्का पाटील या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले.
विद्यार्थ्यांना नंदिनी पाटील, महानंदा बक्कनावर, बबीता देसाई, भाग्यरेखा खटावकर, प्राची शहा, सन्मती पाटील, शोभा इंगळे, शाहिस्ता सय्यद, अश्विनी हत्ती, वैशाली देशमाने, ऋतुजा पाटील, मनीषा आईवळे यांचे मार्गदर्शन लाभले
प्राथमिक शाळेच्यामुख्याध्यापिका ज्योती हारदी यांनी स्वागत केले. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली जोशी यांनी आभार मानले.