Sunday , February 9 2025
Breaking News

विधानसौधमध्ये अनधिकृतपणे पैशांची वाहतूक

Spread the love

 

एकाला अटक; शिवकुमारांची चौकशीची मागणी

बंगळूर : विधानसौधमध्ये अवैधरित्या पैसे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत सुमारे दहा लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.

बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक सहाय्यक अभियंता विधानसौधच्या पश्चिम दरवाजातून अवैधरित्या पैसे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी गेटवर तपासणी केली असता मंड्यातील या व्यक्तीच्या बॅगेत मोठी रक्कम असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या व्यक्तीला पैशाच्या स्त्रोताबाबत विचारणा केली असता त्याने कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. या संदर्भात पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन रक्कम जप्त केली आहे.
ही व्यक्ती विधानसौधाकडे एवढी रक्कम का घेऊन जात होती, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. या पैशाचा स्रोत कोणता याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. वृत्तानुसार, पोलिसांनी या संदर्भात एफआयआर नोंदवला असून तपास सुरू आहे.

न्यायालयीन चौकशीची मागणी
विधानसौधामध्ये सापडलेल्या पैशाच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.
विधानसौध येथे एका व्यक्तीला पोलिसांनी पैशांसह अटक केली. एका मंत्र्याच्या घरातून पोलिसांना दूरध्वनी आला. त्या व्यक्तीला पाठवले आहे. हा पैसा कोणाचा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, याची सत्यता लोकांना कळायला हवी, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि मंत्री ४० टक्के आणि ५० टक्के कमिशनचे पुरावे मागत आहेत. अनेक ठेकेदारांनी पत्र लिहून आत्महत्या केल्या. इतर काहींनी राष्ट्रपतींना पत्र लिहून दया मरणाची विनंती केली. यापेक्षा कोणते जास्त पुरावे हवेत. विधानसौधच्या भिंती सांगत आहेत पैसा हा पैसा, असे ते म्हणाले.
केवळ विधानसौधमध्येच नाही तर ग्रामपंचायत, महामंडळासह सर्वच विभागात पैशाशिवाय काहीच चालत नाही. अधिकारी आणि मंत्र्यांना पैसे दिल्याशिवाय एकही फाईल पुढे जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
विधानसौध येथे पैसे सापडल्याप्रकरणी मंत्री सी.सी.पाटील यांनी राजीनामा द्यावा का, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, कोणता राजीनामा हवा, ते देत नाहीत. बी अहवाल लिहून प्रकरण बंद करून टाकतील. हे सरकार ६० दिवस राहणार आहे. राज्यातील प्रत्येकाने सरकारी भ्रष्टाचार अनुभवला आहे. ते म्हणाले की, कर्नाटकने देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असा लौकिक मिळवला आहे.
भ्रष्टाचाराची प्रकरणे झाकली जात आहेत. लाचेसाठी पुरावे मागतात. पुरावे वाचवून सगळेच भ्रष्टाचार करतात का, असा सवाल करत त्यांनी विधानसौधमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर चर्चा व्हायला हवी होती, असे सांगितले. पण संधी देण्यात आली नाही. त्यांना आम्ही लोकांसमोर नेऊ. भ्रष्टाचाराचे आरोप झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पैसा कुठे सापडला आहे, हे प्रकरण ईडीलाही सोपविले जाणार नाही आणि आयकर विभागही जुमानणार नाही. यापूर्वीचे अनेक घोटाळे अशा प्रकारे झाकण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बँक फसवणूक प्रकरण; भाजपचे माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी यांना तीन वर्षांची शिक्षा

Spread the love  बंगळूर : ७.१७ कोटी रुपये बँक फसवणूक प्रकरणात गुरुवारी एका विशेष न्यायालयाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *