Saturday , November 7 2026
Breaking News

बेळगावातील दीड कोटींच्या गजेंद्रची महाराष्ट्रात चर्चा

Spread the love

 

सोलापूर : महाराष्ट्रातील सोलापुरात सध्या बेळगावमधील शेतकऱ्याच्या रेड्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गजेंद्र नाव असलेल्या 5 वर्षांच्या या रेड्याला हरियाणातील मंडळींनी तब्बल दीड कोटीत विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकाने हा रेडा पाळला आहे. सोलापुरात प्रसिद्ध सिद्धेश्वर देवस्थानाकडून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात बेळगावमधील शेतकऱ्याचा हा ‘गजेंद्र’ सहभागी झाला होता. छोट्या हत्तीसारखा दिसणारा हा रेडा रोज 10 लिटर दूध पितो. त्याचा रोजचा व्यवस्थापनाचा खर्च सुमारे 2000 रुपये आहे. विशेष म्हणजे या रेडयापासून मालकाला रोज किमान 10000 रुपये उत्पन्न सुद्धा मिळते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *