येळ्ळूर : सरकारी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे 03/1/2023 रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रसिका रवींद्र धामणेकर उपाध्यक्षा एसडीएमसी एमएचपीएस येळ्ळूर या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. दीपप्रज्वलन प्रसिद्ध कायदे सल्लागार श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी, सौ. राजकुंवर तानाजी पावले, सौ. वीणा सतीश पाटील, सौ. शिवानी उमेश पाटील, सौ.कविता अशोक पाटील तसेच शाळेच्या एसडीएमसी सदस्या, सदस्य यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. रसिक रवींद्र धामणेकर यांनी केले.
श्री. उत्तम नारायण खेमनाकर एसडीएमसी अध्यक्ष यांनी श्रीफळ वाढविले. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे व नाट्यप्रयोग सादर केले. प्रमुख पाहुण्या श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे व शाळेचे कौतुक केले. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील यांनी आपल्या भाषणातून आपली मातृभाषा जिवंत ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कसे प्रयत्न केले पाहिजे हे सांगितले. तसेच राजकुंवर पावले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण केले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच एसडीएमसी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. एस. आर. निलजकर यांनी केले, सूत्रसंचालन एस. बी. पाखरे यांनी तर स्वागत प परिचय ए. वाय. मेणसे यानी केले शेवटी एम. वाय. कडलीकर यांनी आभार मानले.