Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

गुंजी येथे हळदीकुंकु व तक्रार निवारण कार्यक्रम

  खानापूर : आज सायंकाळी गुंजी येथील नवदुर्गा सहकारी संस्थेकडून हळदीकुंकुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. सोनाली सरनोबत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. गुंजी माऊली देवस्थानमध्ये सदर कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनी आपल्या नियती फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्षाचे कार्य तसेच भाजप सरकारने केलेल्या योजनांबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, …

Read More »

भगव्यावर कर्नाटक पोलिसांची वक्रदृष्टी!

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर येथे आयोजित केलेले धरणे आंदोलन यशस्वी झाल्याने पोटशूळ उठल्याने कर्नाटक प्रशासनाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या, बेळगावहुन कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व वाहनाचे नंबर पोलीस नोंद घेऊनच मग पोलिसांनी कोल्हापूरला गाड्या सोडल्या त्यानंतर परत कोल्हापूर येथून परतत असताना वंटमुरी येथे गाडीवर भगवा लावलेल्या गाड्या काकती पोलिसांनी अडवले आणि …

Read More »

कोल्हापूरात महाराष्ट्र एकीकरण समितीचा एल्गार

    कोल्हापूर : मराठी माणसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मराठी माणसांची गळचेपी करू नका, असा इशारा देत रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल में, संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय असो, अशा घोषणांनी कोल्हापुरात सीमावासियांसाठी एल्गार करण्यात आला. बेळगावहून आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. बेळगावहून रॅलीने कार्यकर्त्यांचे …

Read More »

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; उद्धव ठाकरे

  नागपूर : कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं देखील कर्नाटकविरोधात ठराव मंजूर करावा अशी मागणी विरोधक सातत्यानं करत आहेत. आज उद्धव ठाकरेंनी देखील विधानपरिषदेत हल्लाबोल केला आहे. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं …

Read More »

शिंदोळी गावात दोन तरुणांची हत्या

  बेळगाव : बेळगावजवळील शिंदोळी गावात दोन तरुणांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास मारीहाळ पोलीस मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या विमानतळावर आगमनाच्या बंदोबस्तात व्यस्त असताना सांबऱ्या जवळील शिंदोळी येथे  डबल मर्डरची घटना घडल्याने खळबळ माजली होती. रात्री अकराच्या सुमारास …

Read More »

गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दूध उत्पादकांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबीर

  बेळगाव : बेळगुंदी क्रॉस गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दूध उत्पादकांसाठी सोमवार दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत उचगाव येथील शंकर पार्वती मंगल कार्यालय येथे एकदिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पशुसंगोपन तज्ञ अरविंद पाटील (नानीबाई चिखली ता. कागल) हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अरविंद …

Read More »

कै. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेचा शुभारंभ!

  बेळगाव : बहुजन समाजातील प्रेरक श्रमदाते कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठान मण्णूर तालुका बेळगाव यांच्या विद्यमाने गेली सात वर्षे चालू असलेली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रित व्याख्यानमालेला मण्णूर येथील मण्णूर हायस्कूलच्या सभागृहात मराठी विषयाच्या सी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्हीपासून अलिप्त राहून येत्या दोन …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील 49 मंदिरांवर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासंबंधी धर्मादाय विभागाची नोटीस

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हिंदू मंदिरांवर सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. बेळगाव शहरातील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरासह जिल्ह्यातील 49 मंदिरांवर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासंबंधी धर्मादाय विभागाने नोटीस दिली असून त्यामुळे मंदिर व्यवस्थापनात असंतोष पसरला आहे. बेळगाव येथील कपिलेश्वर देवस्थान, साई मंदिर, टिळकवाडी, होनगा येथील भैरव कलमेश्वर अश्वत्थ नारायण देवस्थान, मारुती …

Read More »

दिवंगत ॲड. राम आपटे यांची 27 डिसेंबरला शोकसभा

  बेळगाव : बेळगाव परिसरातील सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यातर्फे येत्या मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील, समाजवादी कार्यकर्ते व बेळगाव शाखा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत ॲड. राम आपटे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात …

Read More »

श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजींची बेळगावमधील विविध समाजातील प्रमुखांशी भेट

  बेळगाव : सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन विकास साधावा, सर्व प्रथम आपण माणूस आहोत. समाजाचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी जाती व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणून सर्व घटकांनी एकत्रित येऊन विकास साधावा, असे आव्हान श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजींनी केले. बेळगावमधील अनेक समाज प्रमुखांची भेट घेतली त्यामध्ये श्री विश्वकर्मा मनु-मय …

Read More »