Saturday , February 8 2025
Breaking News

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; उद्धव ठाकरे

Spread the love

 

नागपूर : कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं देखील कर्नाटकविरोधात ठराव मंजूर करावा अशी मागणी विरोधक सातत्यानं करत आहेत. आज उद्धव ठाकरेंनी देखील विधानपरिषदेत हल्लाबोल केला आहे. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालंय. याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी आग्रही भूमिका मांडत आहे. परंतु सीमावादावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी ब्र तरी तोंडातून काढला का? सीमाप्रश्न सुरू असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज होती का? दिल्लीत जाऊन ते सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केली आहे.

नुसती बडबड नको? आजच ठराव करा: उद्धव ठाकरे

सीमाप्रश्नी उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने बरखास्त केली. येथे ग्रामपंचायत तरी बरखास्त करणार आहात का? नुसती बडबड नको. जर ठराव मांडणार असाल तर सीमा भाग केंद्राने ताब्यात घ्यावा. असाच ठराव असला पाहिजे आजचा ठराव करा आणि केंद्राकडे पाठवा, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी अद्याप तोंडून ब्र का नाही? मुख्यमंत्र्यांना सवाल
मी उगाचच या आंदोलनात होतो त्या आंदोलनात होतो असं म्हणणार नाही. मी माझ्या आईसोबत त्यावेळी तिथं असताना शिवसेनाप्रमुखांना अटक झाली होती. त्यावेळी दहा दिवस मुंबई जळत होती. शिवसेना प्रमुखांनी आवाहन केल्यानंतर मुंबई शांत झाली होती. जनरल करीआप्पा यांना आम्ही उमेदवारी दिली होती. त्यावेळी आमचं हेच म्हणण होतं की, आमची भूमीका भाषा विरोधी नाही. संजय राऊत चीनचे एजंट आहेत असं म्हणतात, कुठून यांनी शोध लावला. आपण नुसतं एकत आहोत कर्नाटक मात्र दररोज एक पाऊल पुढे जात आहेत. कर्नाटक मुख्यमंत्री जोरात दररोज बोलतं आहेत आपले मुख्यमंत्री काहीचं बोलत नाहीत. एक शब्द अजूनही त्यांनी काढला नाही.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्र केसरीची गदा पृथ्वीराज मोहोलने पटकावली; अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने मैदान सोडले

Spread the love  पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली. या स्पर्धेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *