बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर येथे आयोजित केलेले धरणे आंदोलन यशस्वी झाल्याने पोटशूळ उठल्याने कर्नाटक प्रशासनाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या, बेळगावहुन कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व वाहनाचे नंबर पोलीस नोंद घेऊनच मग पोलिसांनी कोल्हापूरला गाड्या सोडल्या त्यानंतर परत कोल्हापूर येथून परतत असताना वंटमुरी येथे गाडीवर भगवा लावलेल्या गाड्या काकती पोलिसांनी अडवले आणि पोलीस स्थानकाला यायला लागेल असे सांगितले. त्यानंतरच सोडण्यात येईल असे सांगितले. पण संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी “अगर आमची गाडी सोडणार नसाल तर एक ही गाडी इथून जाणार नाही म्हणून महामार्ग अडविण्यास सुरवात केली कार्यकर्त्यानी घेतलेल्या कठोर भूमिकामुळे पोलीस मवाळ झाले आणि परिस्थिती आणखी बिघडवु नये यासाठी गाडी सोडली त्यानंतर वातावरण निवळले.
