खानापूर : आज सायंकाळी गुंजी येथील नवदुर्गा सहकारी संस्थेकडून हळदीकुंकुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. सोनाली सरनोबत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. गुंजी माऊली देवस्थानमध्ये सदर कार्यक्रम घेण्यात आला.
त्यांनी आपल्या नियती फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्षाचे कार्य तसेच भाजप सरकारने केलेल्या योजनांबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गरजू आणि गरिबांना मदत करण्यासाठी पुढे सरसावते. खानापूर हा अविकसित तालुका असल्याने त्याकडे अधिक लक्ष देण्याची व काळजी घेण्याची गरज आहे. त्या पुढे म्हणाल्या, खानापूरच्या अबनाळी, घश्तोल्ली, मोहीशेत, पाली, मेंदिल सारख्या खेड्यांमधील रेशन दुकाने आणि रेशन वितरण केंद्रातून जवळपास 37 गावांना त्यांच्या दारात रेशन मिळाले. वंचित विद्यार्थ्यांना फी आणि शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी मदत केली आहे, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले आहेत. डॉ. सोनाली समर्थित भाजपचे तक्रार निवारण केंद्र रेशन कार्ड, श्रम कार्ड, विधवा पेन्शन, उज्ज्वला योजना, समृद्धी योजना, अंत्योदय योजना आदी सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी नेहमी कार्य करतो. समाजातील महिलांनी त्यांचे हक्क आणि कर्तव्ये देखील समजून घेणे आवश्यक आहे. त्यांनी खानापूरमधील महिलांच्या मानसिक, शारीरिक, भावनिक आणि सामाजिक कल्याणाबद्दल तसेच विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
आंतरराष्ट्रीय कराटेपटू असलेल्या प्रतिक्षा घाडी हिचा डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि तिला तिच्या खेळाबद्दल ५००० रुपयांचा धनादेश देण्यात आला.
व्यासपीठावर डॉ. सोनाली सरनोबत, श्रीमती लक्ष्मी घाडी, श्रीमती सीता घाडी, श्रीमती सुधा घाडी, श्रीमती स्वाती गुरव, रुक्मिणी भेकणे, राधिका दोरकडी, दीपा पवार, वैष्णवी पाटील, सुधा मानगावकर, राजश्री आजगावकर, सुभाष घाडी यांची उपस्थिती होती.
श्री. विनायक कुलकर्णी यांनी समारंभाचे सुत्रसंचलन केले.
अपघातात हातपाय गमावलेले आणि विजया हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आलेले श्री. संभाजी अर्जुन पाटील हे कुटुंबातील एकमेव कमावते असल्याने त्यांना नियती फाउंडेशनकडून ११ हजारांची मदत देण्यात आली.
शेवटी सुभाष घाडी यांनी आभार मानले.