Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

नंदगड येथे दुर्गा दौडचे स्वागत उत्साहात

  खानापूर : आज नंदगड येथे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी काढण्यात आलेल्या दुर्गा दौडचे स्वागत दुर्गानगर नंदगड येथे आनंदी वातावरणात मोठ्या उत्साहाने करण्यात आले. दौडमध्ये तरुण युवक व युवतींची तसेच लहान दौडकांची लक्षणीय उपस्थिती होती. आज पहाटे लक्ष्मी मंदिर येथून दौडची सुरुवात होऊन सांगता कार्यक्रम दुर्गानगर येथे पार पाडला. यावेळी दौडचा …

Read More »

येळ्ळूर येथे दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात…

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अखंड जयघोष आणि गजरात येळ्ळूर येथे दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात काढण्यात आली. आज दुर्गामाता दौडच्या चौथ्या दिवशी येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून पहाटे येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महारजांच्या पुतळ्याचे पूजन करून …

Read More »

माडीगुंजी श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला 5 ऑक्टोबरपासून प्रारंभ

खानापूर : सालाबादप्रमाणे विजयादशमी रोजी मौजे माडीगुंजी, ता. खानापूर येथील बुधवार दि. 05-10-2022 पासून श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून शनिवार दि. 08-10-2022 रोजी सायं. ठीक 5.00 वाजता यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. बुधवार दि. 05-10-2022 रोजी सकाळी 8.00 वा. श्री माऊली देवीस अभिषेक व ठीक 11.00 वा. देवीला शृंगारण्याचा विधि …

Read More »

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध समस्यांबाबत शहर देवस्थान कमिटीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा

  बेळगाव : बेळगाव येथे दसरा सण भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर येत्या बुधवार दि. 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा सण मोठ्या प्रमाणात परंतु शांततेने साजरा करण्यासंदर्भात आज गुरुवारी आमदार अ‍ॅड. बेनके यांच्या नेतृत्वाखाली शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व पदाधिकार्‍यांची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासमवेत बैठक पार पडली. …

Read More »

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून अशोक गेहलोत यांची माघार

  जयपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरुन काँग्रेस आमदारांनी केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटाबाबत सोनिया गांधींची माफी मागितल्याचे गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले …

Read More »

रिअल इस्टेट एजंट सुधीर कांबळे खूनप्रकरणी पत्नी, मुलगीसह एकाला अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात 16 सप्टेंबर रोजी रात्री रियल इस्टेट एजंट सुधीर भगवानदास कांबळे (वय 57, रा. मद्रास स्ट्रीट कॅम्प) यांचा घरात घुसून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. शनिवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी मयत सुधीरच्या भावाने दिलेल्या …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी बैठकीत शहरातील स्वच्छतागृहांबाबत चर्चा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी दररोज २० रूपये एका स्वच्छतागृहाला खर्च करून शहरातील स्वच्छतागृह व्यवस्थित ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर नगरपंचायतीच्या २० वार्डातून कुपनलिकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाणी सोडण्यावर नियंत्रण नसल्याने याचा दुरूपयोग होत आहे, असे मत नगरसेवक नारायण मयेकर यानी मांडले. काही कुपनलिकाना नागरिक …

Read More »

यल्लमा देवस्थान परिसरातील समस्यांबाबत किरण जाधव यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव (प्रतिनिधी) : सौंदत्ती यल्लमा देवस्थान परिसर विविध नागरी समस्यांनी ग्रासले आहे. येथील समस्या भाविकांना भेडसावणाऱ्या आहेत. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन भाविकांना आवश्यक असणाऱ्या सुविधांची पूर्तता करून भाविकांची सौंदत्ती यल्लमा यात्रा सुकर होईल याची काळजी घ्यावी, अशा आशयाचे निवेदन भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव, सकल मराठा समाजाचे …

Read More »

घरफोडीत सहभागी असल्याच्या संशयावरून रामनगरातून तिघे ताब्यात

  खानापूर, : गेल्या कांही महिन्यापासून पोलिसांना चकवा देत दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या तिघांना नंदगड पोलिसांनी रामनगरमधून (ता. जोयडा) स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. मंगळवारी मध्यरात्री रामनगर औद्योगिक वसाहतीत कारवाही केली. त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. काही दिवसांपासून हावेरीतील हे तिघे भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद …

Read More »

राष्ट्रपती मुर्मू यांचा विधानसौधमध्ये नागरी सत्कार

  पद्मश्री पुरस्कार विजेते जोगती मंजम्मा, पदुकोणसह मान्यवरांची उपस्थिती बंगळूर : राज्याचे शक्ती केंद्र विधानसौध येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा मंगळवारी सायंकाळी नागरी सत्कार करण्यात आला. त्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची निवड करण्यात आली होती. इस्कॉनचे मधू पंडित दास (समाजसेवा), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चंद्रशेखर कंबार (साहित्य), बॅडमिंटनपटू …

Read More »