Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

मराठा मंदिरात भव्य शॉपिंग उत्सव 60 हून अधिक स्टाॅल्सचा सहभाग

  बेळगाव : भारतीय ट्रेडर्स आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान शॉपिंग उत्सव- कंजूमर प्रदर्शनाचे 10 दिवस आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंदिराच्या भव्य सभागृहात होणाऱ्या या प्रदर्शनात 60 हुन अधिक कंपन्याने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे ब्रँडेड गारमेंट्स …

Read More »

साचलेल्या पाण्यात जिल्हाधिकारी फिरले अनवाणी पायांनी!

  २४ तासांत मदतीची कार्यवाही : जिल्हाधिकारी नितेश पाटील बेळगाव : काल रात्रीपासून आज दिवसभरात बेळगाव शहर आणि परिसरात पावसाने जोर धरला आहे. रात्रीच्या पावसामुळे शहर आणि उपनगर भागातील अनेक नागरिक वसाहतींमध्ये घराघरात पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाणी …

Read More »

सौंदलगा येथील कै. नागोजी मेस्त्री यांचे स्मरणार्थ दूध व बिस्किटे वाटप

  सौंदलगा : येथील मंडल पंचायतीचे माजी सदस्य व ग्रामपंचायत नामवंत कॉन्ट्रॅक्टर, काल कथित कै. नागोजी संतराम मेस्त्री यांचे २ जुलै २०२२ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ नागपंचमी निमित्त, बसव पंचमी म्हणून या दिवशी दिनकर मेस्त्री, विक्रम मेस्त्री, कुमार मेस्त्री यांनी रचनावादी बालक-पालक स्कूलमध्ये पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांना …

Read More »

स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयात तिरंगा ध्वज वाटप

  बेळगांव : दिनांक 08 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात आयोजित करण्यात येणार्‍या हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून महाशक्ती प्रमुख व नगरसेवकांना तिरंगा ध्वज देण्यात आला. यावेळी बेळगांव उत्तर मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय कोडगनूर व सरचिटणीस श्री. विनोद लंगोटी, …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्राबरोबर

  कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्‍या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे. शनिवार तारीख 6 व रविवार तारीख 7 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला …

Read More »

आमदार अनिल बेनके यांच्याकडून श्रीनगर नाला व किल्ला तलावाची पाहणी

  बेळगांव : दिनांक 08 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी श्रीनगर नाला व किल्ला तलावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी श्रीनगर येथील नाल्यांची चोकअप साफ करण्याच्या आणि सुरळीत पाण्याच्या प्रवाहासाठी राष्ट्रीय ध्वजाजवळील किल्ला तलाव स्वच्छ करा, अशा संबंधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या.

Read More »

नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांचा रयत संघटनेतर्फे सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील तहसीलदार कार्यालयात नूतन तहसीलदार म्हणून प्रवीण कारंडे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजू पोवार यांनी, निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडवण्याचे …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार साहित्यिक महादेव मोरे यांना जाहीर

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार-2022’ साहित्यिक श्री. महादेव मोरे (निपाणी) यांना जाहीर करण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरुप रुपये पंचवीस हजार, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. याआधी ‘पानीपत’कार विश्वास पाटील (मुंबई), श्री. अरुण साधू (मुंबई), डॉ. जयसिंगराव पवार …

Read More »

अलमट्टी धरण 95 टक्के भरले, 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु

  कोल्हापूर : अलमट्टी धरणात 95 टक्के पाणीसाठा झाल्याने 72 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जोरदार दमदार पावसाने आज धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे. यापूर्वी 6 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरणाची पाणी क्षमता 123.01 …

Read More »

लक्ष्य सेन चमकला; बॅडमिंटनमध्ये भारताला आणखी एक सुवर्ण

  बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूनी चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने सुवर्णपदक पटकावले. तिच्यापाठोपाठ लक्ष्य सेननेदेखील धडाकेबाज खेळू करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. लक्ष्यने पुरुष एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे. …

Read More »