Thursday , June 4 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयाचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार साहित्यिक महादेव मोरे यांना जाहीर

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार-2022’ साहित्यिक श्री. महादेव मोरे (निपाणी) यांना जाहीर करण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरुप रुपये पंचवीस हजार, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे.
याआधी ‘पानीपत’कार विश्वास पाटील (मुंबई), श्री. अरुण साधू (मुंबई), डॉ. जयसिंगराव पवार (कोल्हापूर), श्री. उत्तम कांबळे (नाशिक), कॉ. कृष्णा मेणसे (बेळगाव), डॉ. सदानंद मोरे (पुणे), पद्मश्री मधु मंगेश कर्णिक (मुंबई), श्री. सतीश काळसेकर (मुंबई), श्री. कुमार केतकर (मुंबई), श्री. विष्णू सूर्या वाघ (गोवा), डॉ. आ. ह. साळुंखे (सातारा), रावसाहेब कसबे (नाशिक), डॉ. राजन गवस (गारगोटी), मनस्विनी लता रवींद्र (मुंबई) व प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सदर साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दिनांक 14 ऑगष्ट 2022 रोजी सायंकाळी 5-30 वाजता सार्वजनिक वाचनालयाचे सभागृह, गणपत गल्ली, बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमात त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *