Monday , September 21 2026
Breaking News

अलमट्टी धरण 95 टक्के भरले, 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु

Spread the love

 

कोल्हापूर : अलमट्टी धरणात 95 टक्के पाणीसाठा झाल्याने 72 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जोरदार दमदार पावसाने आज धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे. यापूर्वी 6 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरणाची पाणी क्षमता 123.01 टीएमसी आहे. आतापर्यंत 117.376 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये सध्या 37 हजार 41 क्युसेस पाण्याची आवक होत आहे, तर 72 हजार क्युसेक्सने विसर्ग केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *