Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

सांबरा प्राथमिक मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

बेळगाव : शिक्षकांनी केलेले संस्कार, चुकीच्या वेळी केलेली शिक्षा, वर्गातील गमतीजमती, परीक्षेचा तणाव, निकालाची उत्सुकता अशा अनेक आनंदी तर काही भावनिक आठवणींना उजाळा देत सांबरा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या 1994- 2001 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या आवारात उत्साहात पार पडला. तब्बल 21 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारावलेल्या वातावरणात …

Read More »

व्हिडीओ चुकीचा असल्याची देवाप्पा गुरव यांची स्पष्टोक्ती

खानापूर : रविवार दि. 29 रोजी दुपारी खानापूर तालुका समितीला कांहीं कार्यकर्त्यांनी मला जबरदस्तीने नेऊन खोटेनाटे सांगून खानापूर समितीच्या एकीच्या प्रक्रियेत बाधा आणण्याच्या हेतूने माझ्याकडून त्यांनी लिहिलेले वाचून घेतले. त्या दरम्यान त्यांनी जाणीवपूर्वक माझा व्हिडीओ काढला आणि तो समाज माध्यमांवर प्रसारित केला. त्यामुळे तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला. त्याकरिता …

Read More »

मातृभाषेतुन शिक्षण घेणे, हाच भविष्यातील पाया आहे : प्रा. मनीषा नाडगौडा

बेळगाव : आत्मविश्वासातून आयुष्यात चांगले वळण लागते. अभ्यासाबरोबरच छंद जोपासावा, खेळात प्राविण्य मिळवावे जिद्द कसोटीतून आपण आपले ध्येय गाठू शकतो आदर, प्रामाणिकपणा हेच गुण जीवनात यशस्वी करू शकतात. मातृभाषेतून शिक्षण घेणे हाच भविष्यातील पाया आहे, असे प्रतिपादन प्रा. मनीषा नाडगौडा, बी.डी. जती कॉलेज यांनी अध्यक्षपदावरून विद्यार्थी गौरव सोहळ्यात विचार व्यक्त …

Read More »

गुजरात रायटन्स चॅम्पियन!

अहमदाबाद : कर्णधार हार्दिक पंड्याच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर आपला पहिलाच हंगाम खेळणार्‍या गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावले. येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला 7 गड्यांनी हरवले. कर्णधार हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजीत 3 गडी बाद तर फलंदाजीत 34 धावा जोडल्या. त्याला सामनावीरचा …

Read More »

मुख्याध्यापक वाय. एच. पाटील व एस. एन. जाधव यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

बेळगाव : पश्चिम विभाग शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश हायस्कूल बिजगर्णीचे (ता. बेळगाव) मुख्याध्यापक वाय. एच. पाटील व लिपिक एस. एन. जाधव यांचा शुक्रवारी (ता.२७) निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. हायस्कूलच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप देण्यात आला. व्यासपीठावर …

Read More »

कावळेवाडीचा उदयोन्मुख कुस्तीपटू पै. रवळनाथला दहा हजाराचे सहकार्य

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयच्या वतीने गावातील शाळेत पै.रवळनाथ श्रीधर कणबरकर याचा सन्मान करण्यात आला. रवळनाथ हा नुकताच हरियाणा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन आला आहे. बाबा भोलादास आखाड्यात दीड महिना सराव केला. सोनिपत खरकोदा येथील राष्ट्रीय पातळीवर कुस्ती कोच अशवनी दया यांच्याकडे त्याने प्रशिक्षण …

Read More »

अक्षता नाईक उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानीत

बेळगाव : अतिशय निष्ठेने पत्रकारितेचे व्रत हाती घेतल्याबद्दल तसेच समाजात कर्तृत्वाने यश साध्य करता येते हे दाखवून देत गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असल्याबद्दल अक्षता नाईक यांचा युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यातर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर सन्मान सोहळा कोल्हापूर येथील नष्टे लॉन येथे आज …

Read More »

चंदगडच्या तरूणांना गोव्यात ब्लॅकमेल करून लुटलेल्या तिघाना गोवा पोलिसाकडून अटक

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गोव्याला फिरायला गेलेल्या चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना एका खोलीत कोंडून त्यांचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही घटना गुरुवारी (दि. २६) गोव्यात घडली होती. या घटनेनंतर पीडित तरुण गेले दोन दिवस भीतीच्या छायेत होते. त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी …

Read More »

भोगावती नदीत बुडून शाळकरी मुलीचा मृत्यू

कोगनोळी : राधानगरी धरणातून भोगावती नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना सोन्याची शिरोली (तालुका राधानगरी) येथे घडली. सई नामदेव चौगुले (वय 10) असे या मुलीचे नाव असून, ती गावातील प्राथमिक शाळेत तिसरीमध्ये शिकत होती. दरम्यान, नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी …

Read More »

बेळगावात कन्नड साहित्य भवनात अज्ञाताचा गोंधळ

बेळगाव : बेळगावातील कन्नड साहित्य भवनातील महिला शौचालयात घुसुन रविवारी सकाळी एकाने चांगलाच गोंधळ घातला. त्याला बाहेर काढण्यासाठी भवनाचे कर्मचारी आणि पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. आज सकाळी 7 च्या सुमारास भवनातील महिलांसाठी असलेल्या शौचालयात घुसून या बहाद्दराने आतून कडी लावली. काही केल्या तो बाहेर यायचे नाव घेत नव्हता. भवनच्या …

Read More »