Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

बेळगाव नागपूर स्टार एअरच्या विमान सेवेस सुरुवात

बेळगाव : स्टार एअर कंपनीने बेळगाव ते नागपूर हे नवे विमान आजपासून सुरू केले या नव्या विमानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एक छोटेखानी कार्यक्रम करून नव्या विमानाची सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळावर स्टारएअरने आयोजित छोटा कार्यक्रम आकर्षण ठरला. रिबन कटिंग, दिवाबत्ती आणि केक कटिंग करण्यात …

Read More »

भाजप-काँग्रेसला आत्महत्येवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही : भास्कर राव

बेळगाव : ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणावर भाजप आणि काँग्रेसला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. दोन्ही पक्ष मगरीचे अश्रू ढाळत आहेत असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते व निवृत्त आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी केला. बेळगावमध्ये शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आयपीएस अधिकारी आणि आप पक्षाचे नेते भास्कर राव म्हणाले की, कंत्राटदार …

Read More »

एक मुखाने बोला, जय जय हनुमान! निपाणीत हनुमान जयंती साजरी

धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी (ता.16) हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयार करण्यात आली होती. यानिमित्त विविध मंडळे, ट्रस्ट आणि मंदिर प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजल्यापासून अनेक मंदिरात ’एक मुखाने बोला, जय जय हनुमान’चा गजर सुरू होता. दिवसभर शहर …

Read More »

पंजाबमध्ये आप सरकारने करून दाखवलं! 1 जुलैपासून प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत

चंदीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारने सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वीज देण्याच्या आश्वासनाबाबत मोठी घोषणा केली आहे. पंजाब सरकारकडून शनिवारी पंजाबमधील प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नवा नियम येथे 1 जुलै 2022 पासून लागू होईल. …

Read More »

कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीला सुरुवात; चौथ्या फेरीनंतर जयश्री जाधव 7273 आघाडीवर

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुसर्‍या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा …

Read More »

कर्नाटकात पुन्हा भाजपाची सत्ता : रमेश जारकीहोळी

संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभेची निवडणूक २०२३ मध्ये होत आहे. सदर निवडणुकीत भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते शिवकृपा कार्यालयात बोलत होते. ते पुढे म्हणाले, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा निर्विवाद बहुमत मिळविले यात तीळमात्र शंका नाही. सहा वर्षे भाजपाला चिंता …

Read More »

ईश्वरप्पा यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

लवकरच दोषमुक्त होण्याचा विश्वास, चाहत्यांच्या समर्थनार्थ घोषणा बंगळूर : ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी गुरूवारी घोषणा केल्याप्रमाणे आज (ता. १५) सायंकाळी सुमारे सव्वाआठ वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केला आहे. ईश्वरप्पा यांच्यावर कंत्राटदार संतोष पाटील यांना आत्महत्या …

Read More »

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्येमागे काँग्रेसचा हात! : प्रल्हाद जोशी

बेंगळुर : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरण मागे काँग्रेसचा हात असून त्यांच्या हावभावावरून हि बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, मंत्री ईश्वरप्पा यांचा राजीनामा पक्षाने जड अंतःकरणाने स्वीकारला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. विजापूर जिल्ह्यातील तोरवी येथे लक्ष्मी नरसिंह देवस्थानात दर्शनासाठी …

Read More »

जिल्हा श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी विविध योजना

बेळगाव : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे श्रमिक पत्रकारांना विविध सुविधा देण्यात येत असून, त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे गौरवाध्यक्ष भीमशी जारकीहोळी यांनी केले आहे. बेळगावात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना भीमशी जारकीहोळी यांनी जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या आगामी योजनांची माहिती दिली. पत्रकारांना आरोग्य …

Read More »

विद्या आधारचा विद्यार्थी नम्रता देसाईला आधार!

बेळगाव : शांताई विद्या आधारतर्फे आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली असून गरजू आणि गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा शांताई विद्या आधारचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन शांताईचे संचालक माजी महापौर विजय मोरे यांनी केले. बेकवाड, तालुका खानापूर येथील नम्रता देसाई या विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी शांताई विद्या आधारतर्फे 21,000/- …

Read More »