Sunday , July 26 2026
Breaking News

जिल्हा श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी विविध योजना

Spread the love


बेळगाव : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे श्रमिक पत्रकारांना विविध सुविधा देण्यात येत असून, त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे गौरवाध्यक्ष भीमशी जारकीहोळी यांनी केले आहे.
बेळगावात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना भीमशी जारकीहोळी यांनी जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या आगामी योजनांची माहिती दिली. पत्रकारांना आरोग्य सुविधा, त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व पत्रकारांच्या सहकार्याने संघातर्फे चांगले कार्य करणे शक्य होत आहे. यापुढेही असेच सहकार्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे म्हणाले, संघातर्फे बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरात देशातच आदर्श ठरेल असे भव्य हायटेक पत्रकार भवन उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय वृत्तपत्र वितरकांना इलेक्ट्रिक इ-बाईक्स, 100 तिचाकी आणि पिशव्या वितरित करण्यात येणार आहेत. पत्रकारांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, त्यांच्या मुलांसाठी आयएएस, आयपीएस, केपीएससी परीक्षांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन, पत्रकारांच्या मुलांना पहिली ते दहावीपर्यंतचे मोफत शिक्षण, पत्रकारांना आजारपणात तातडीची आर्थिक मदत, बेळगाव शहरात पत्रकारांसाठी भूखंड, आरोग्य तपासणी शिबीर, कायदेशीर मदत तसेच पत्रकार संघाचे सदस्यत्व नोंदणी आणि नूतनीकरण, पत्रकार क्रीडास्पर्धा आणि कौटुंबिक मेळावे, ज्येष्ठ पत्रकारांसोबत रविवारच्या गप्पा आणि पत्रकारांना सल्ला-सूचना देणे आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती कुरुंदवाडे यांनी यावेळी दिली.
यावेळी श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यत्व नोंदणीच्या नव्या अर्जाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार विलास जोशी यांचा 53 वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व पत्रकारांनी जोशी याना शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *