Friday , April 17 2026
Breaking News

कर्नाटकात पुन्हा भाजपाची सत्ता : रमेश जारकीहोळी

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभेची निवडणूक २०२३ मध्ये होत आहे. सदर निवडणुकीत भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते शिवकृपा कार्यालयात बोलत होते. ते पुढे म्हणाले, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा निर्विवाद बहुमत मिळविले यात तीळमात्र शंका नाही. सहा वर्षे भाजपाला चिंता करण्याचे कारण नाही. राज्यातील जनतेचा कौल भाजपाला राहिल्याने काॅंग्रेसचे नेते हताश होऊन खोटारडे आरोप करत सुटले आहेत. देशात कोठेच काॅंग्रेसची डाळ शिजेनासी झाली आहे.
जातीयवाद नाही…
गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र असो सी. टी. रवि राज्यात जातीयवाद निर्माण करण्याचे कार्य केलेले नाही. गृहमंत्री यांनी केलेल्या वक्तव्यावर काॅंग्रेसने टिकाटिपणी चालविली आहे. त्यामुळे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी बोललेला शब्द मागे घेतला आहे. भाजपा नेत्यांनी हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचे कार्य केलेले नाही.
हिंन्दू-मुस्लीम वाद नको..
कर्नाटकात हिंदू-मुस्लीम आजपावेतो गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. त्यांच्यातील बंधुभाव कायम ठेवण्याचे कार्य प्रत्येकाकडून होण्याची आवश्यकता आहे. आपण जातपात मानत नाही. त्यामुळे जातीय राजकारणाला पाठींबा देण्याचे कार्य आपण कदापि करणार नाही. भाजपाचे नेते जातीयवाद निर्माण करण्याचे कार्य केल्यास त्याला आपला विरोध राहणार आहे. आपला भारत देश अनेकतेत एकता दर्शविणारा आहे. विविध जाती धर्माचे, विविध भाषा बोलणारे लोक भारतात राहतात. त्यामुळे भारतात जातीयवादला कोठेच पुष्टी मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक ॲड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, आणप्पा संगाई, बंडू सुर्यवंशी, राजेश गायकवाड, राहुल हंजी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षे कारावास; १ लाख रुपये दंड

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शंकर नगर येथील आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी (वय २३) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *