Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

इंटेलिजन्सचे राजू बडसगोळ यांना सुवर्ण पदक

बेळगाव : राज्य पोलिस दलातील कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या 135 अधिकारी आणि पोलिसांना मुख्यमंत्री सुवर्णपदक जाहीर झाले आहे. यामध्ये बेळगावच्या सहाहून अधिक अधिकारी व पोलिसांचा समावेश आहे. राज्य गुप्तचर विभागाचे सिनियर इंटेलिजन्स असिस्टंट राजेंद्र उदय बडसगोळ यांना येत्या 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्री सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाणार आहे. राजेंद्र …

Read More »

एबीजी इंडस्ट्रियल प्रॉडक्टच्यावतीने मलप्रभा जाधवचा सत्कार

बेळगाव : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नाव उज्वल करणाऱ्या मलप्रभा जाधव या खेळाडूचे अभिनंदन एबीजी इंडस्ट्रियल प्रॉडक्ट यांच्यावतीने करण्यात आले. स्पर्धेत भाग घेण्यासाठी तिला जाताना शुभेच्छा व सहकार्य करण्यात आले होते. तिने तजिकिस्तान येथील दुष्मानी मध्ये झालेल्या एशियन ग्रास चॅम्पियनशिप स्पर्धेत 48 किलो वजन गटात कांस्य पदक पटकाविले असून त्या स्पर्धेत …

Read More »

दै. कृषिवलतर्फे हळदीकुंकु कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात आढावा बैठक संपन्न

माणगांव (नरेश पाटील) : शुक्रवार दि. 9 एप्रिल रोजी सायंकाळी 04.00 वाजता माणगांव तालुक्यातील गोरेगाव शहर येथे दै. कृषिवलतर्फे महिलांसाठी राजमाता-जिजाऊ मैदान येथे हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम भव्यदिव्य करण्याकरिता म्हणून माणगांव शहर येथे मंगळवार दि. 29 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळी आढावा बैठक …

Read More »

कपिलेश्वर रोड शौर्य संघ ठरला श्रीमंगाईदेवी ट्रॉफीचा मानकरी

बेळगाव : कपिलेश्वर रोड शौर्य या संघाने मंगाईदेवी ट्रॉफी पटकाविली आहे. तर उपविजेता पिरनवाडीच्या सनसेट वॉरियर्स संघ ठरला. गेल्या पंधरा वर्षापासून वडगाव मंगाई देवी परिसरामध्ये श्री मंगाई ट्रॉफी या नावाने हाफ पीच क्रिकेट स्पर्धा भरविली जात आहे. यावर्षीही अशाच पद्धतीने ही स्पर्धा उत्साहात पार पडली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

येडियुरप्पाविरुध्द विशेष फौजदारी खटला नोंदवा

विशेष न्यायालयाचा आदेश, जमीन डिनोटिफिकेशन प्रकरण बंगळूर : बंगळूर येथील एका विशेष न्यायालयाने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर २००६-०७ मध्ये भाजप-धजद युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना जमीन डिनोटिफिकेशन प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराबाबत ‘विशेष फौजदारी खटला’ नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकातील निवडून आलेल्या खासदार/आमदारांशी संबंधित फौजदारी खटल्यांचा निपटारा करण्यासाठी खास स्थापन केलेल्या …

Read More »

जपल्या जाताहेत संभाजीराजांच्या स्मृती!

बेळगाव : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त श्री एकदंत युवक मंडळाच्या वार्ता फलकाजवळ बुधवारी रात्री धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी विधिवत पूजन केले. छत्रपती संभाजी महाराजांनी आमिषाला बळी न पडता धर्मासाठी, स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान केले. हा आपला पराक्रम इतिहास आहे. …

Read More »

उद्योजक नायक हत्या प्रकरणी कुख्यात अंडरवल्ड डॉन बनंजे राजासह एकूण ९ आरोपी दोषी

कारवार : कारवारचे उद्योजक आणि भाजप नेते आर. एन. नायक यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात अंडरवल्ड डॉन बनंजे राजा याच्यासह एकूण 16 आरोपींपैकी 9 जणांना बेळगावच्या कोका न्यायालयाने आज दोषी ठरवून महत्वाचा निकाल दिला.होय, 21 डिसेंबर 2013 रोजी आर. एन. नायक यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. 3 कोटी …

Read More »

मुगळी येथे नवीन रस्ता खचला; पडले भले मोठे खड्डे निकृष्ट दर्जाचे काम; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुगळी (ता. चंदगड) येथे दोन ते तिन दिवसापूर्वी दलितवस्तीमध्ये केलेला नवीन डांबरी रस्ता खचला आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाला जबाबदार कंत्रादारांकडून हे काम अर्धवट झाले असून त्यावर ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा …

Read More »

अनाथ मुलांना जेम्स पाहण्याचं सौख्य..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर येथील एकस्तासीस चिल्ड्रन्स होममधील अनाथ मुलांना दिवंगत सुपरस्टार पुनित राजकुमार यांचा सुपरहिट चित्रपट जेम्स पाहण्याचं सौख्य कु. हर्ष आनंद शिरकोळी यांनी मिळवून दिले आहे. येथील साईनाथ चित्रपटगृहात कुमार हर्षने ३० अनाथ मुलांचं तिकिट बुकिंग करून त्यांची जेम्स चित्रपट पहाण्याची इच्छा पूर्ण केली आहे. कु हर्ष एकस्तासीस …

Read More »

शांतता, विकास आणि सर्वसामान्यांची सुरक्षेला सरकारचे प्राधान्य : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुरू : राज्यात शांतता, विकास आणि सर्वसामान्य जनतेची सुरक्षा यासाठी सरकार प्राधान्य देत असून हिजाब, हलाल प्रकरणांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला पोहोचलेला धक्का, यानंतर सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. विधानसौध येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती …

Read More »