Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

प्रजासत्ताकदिनी विद्यार्थ्यांनी हाती घेतला अभिनव उपक्रम

मास्क आणि हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती बेळगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज विद्यार्थ्यांनी अभिनव कार्यक्रम हाती घेतला होता. यावेळी त्यांनी मास्क आणि हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती केली. शहापूर पोलीस ठाण्यासमोरील मार्गावर हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. दुचाकी वाहन चालविताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करा आणि कोरोना व ओमायक्रोनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क …

Read More »

आमदार बसवराज यत्नाळांना लवकरच मिळणार मंत्रिपद : उमेश कत्ती

  बेळगाव (वार्ता) : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नूतन जिल्हा पालकमंत्री उमेश कत्ती यांनी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना लवकरच मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उमेश कत्ती म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत किंवा बदलाबाबत मंत्रिमंडळात कोणतीही चर्चा होत नाही. हि चर्चा केवळ …

Read More »

गर्लगुंजी प्राथ. मराठी मुलीच्या शाळेत पालक मेळावा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेमध्ये एस्.डी.एम्.सी. व पालक मेळावा सोमवार दि. २४ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती एस. वाय. सोनार होत्या. कार्यक्रमाला शाळा सु़धारणा समितीचे सदस्य आणि पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी पालकांचे स्वागत करून सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची …

Read More »

महामेळावा प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या म. ए. समिती कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महावेळाव्या वेळी अनाधिकृतरित्या रस्त्यावर व्यासपीठ उभारले आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडवणूक केल्या प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या प्रकरणी समिती नेते व कार्यकर्ते अशा 29 जणांना नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. आज 26 जानेवारी रोजी नेताजी जाधव, रणजित चव्हाण पाटील, रेणू …

Read More »

उत्तर कर्नाटकावर काँग्रेसकडून अन्याय : पालकमंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव (वार्ता) : लाज सोडून पदयात्रा काढणार्‍यांना काय बोलावे? काही बोलल्यास काँग्रेस नेत्यांना राग येतो अशा शब्दांत बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी उद्वेग व्यक्त केला. बेळगावात बुधवारी 73 व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, स्वातंत्र्यापासून मागास राहिलेल्या उत्तर कर्नाटक प्रदेशाच्या विकासासाठी बोम्मई नेतृत्वाखालील भाजप …

Read More »

बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन साजरा

बेळगाव (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याने रचना आणि मांडणीच्या बाबतीत ऐतिहासिकदृष्ट्या स्वत:चे महत्त्व नोंदवले आहे. साहजिकच जिल्ह्यातील नागरिक देशभक्त आहेत. राष्ट्रभक्त जिल्ह्यातील जनतेमध्ये राष्ट्रभक्तीचे रक्त आणि नसा वाहत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या जिल्ह्यातील लढवय्यांचे योगदान अतुलनीय आहे, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले. आज बुधवारी सकाळी येथील जिल्हा …

Read More »

शहापूर आळवण गल्ली सरकारी मराठी प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बेळगाव (वार्ता) : शहापूर येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 19 मध्ये आज बुधवारी सकाळी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार श्रीकांत काकतीकर आणि जाएंट्स ग्रुप बेळगाव परिवार अध्यक्ष श्रीधर मुळीक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजस्तंभ, महात्मा गांधी, भारत …

Read More »

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

बेळगाव (वार्ता) : पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी ध्वजारोहण जी. व्ही. कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते झाले. फोटो पूजन विश्वभारत सेवा समितीचे सेक्रेटरी प्रकाश नंदिहळ्ळी, प्राचार्या ममता पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले, त्याचप्रमाणे देशभक्तीपर गीते सुद्धा गायिली. प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजच्या …

Read More »

बिहारमध्ये ’एनटीपीसी’ परीक्षार्थींचा उद्रेक, अनेक ठिकाणी रेल रोको, दगडफेक

नवी दिल्ली : रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी)च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘एनटीपीसी’ परीक्षा निकालात घोटाळा झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी केला होता. हा निकाल रद्द करा अशी मागणी करत शेकडो परीक्षार्थींनी बिहारमध्ये बक्सर, मुजफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरामध्ये रेल रोको आंदोलन केले. पश्चिम गुमटीजवळ सासाराम-आरा पॅसेंजरला आग लावली. पोलिसांवर दगडफेकही केली. …

Read More »

इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा

बेळगाव (वार्ता) : बेळगाव इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने जिल्हा रुग्णालयातील आयएमए हॉल येथे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आयएमएचे सचिव डॉ. संतोष शिंदे यांनी पूजा केली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाल्या, देशाच्या सीमेवर अहोरात्र काम करणार्‍या …

Read More »