Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

माजी नगरसेवक नेताजी जाधव यांचा अमृतमहोत्सव आयोजनासंदर्भात बैठक

  बेळगाव : बेळगावच्या सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे माजी नगरसेवक श्री. नेताजी नारायणराव जाधव यांचा अमृतमहोत्सव करण्यासंदर्भात त्यांच्या हितचिंतकांची एक बैठक आज मराठा मंदिर खानापूर रोड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे हे होते. प्रारंभी माजी महापौर …

Read More »

म. ए. समिती शहापूर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर आणि कोरे गल्ली पंच मंडळाकडून शहापूर भागातील गुणवंत विद्यार्थीसह क्रीडास्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीचे सरपंच सोमनाथ कुंडेकर, प्रमुख पाहुणे मदन बामणे, नेताजी जाधव, राजकुमार बोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन आणि गणेश पूजनाने पाहुण्याच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आणि जिल्ह्यात …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

  बेळगाव : २१ जून रोजी आदर्श नगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये सुमारे ६०हून अधिक काळजी केंद्रातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला आणि प्राचीन भारतीय योगशास्त्राचे धडे गिरविले. मुळात काळजी केंद्रातील मानसिक रुग्णांची शारीरिक आणि मानसिक पातळी उंचावण्यासाठी कायमस्वरूपी रोज सकाळी योगाभ्यास …

Read More »

हरिनामाच्या गजरात धामणे गावची दिंडी वारकरी आषाढी वारीसाठी मार्गस्थ….

  बेळगाव : भेटी लागे जीवा सावळा श्रीरंग.. दरवर्षी बेळगावसह सीमाभागातून हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीत सहभागी होण्यासाठी जात असतात. तसेच अनेक वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले आहेत. बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत. आज धामणे …

Read More »

पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

  महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समिती बैठकीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न कोल्हापूर (जिमाका) : लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर …

Read More »

बेळगाव पोलीस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट!

  बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आले आहे. आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे आणि एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भूषण गुलाबराव बोरसे यांच्या नावाने गुन्हेगारांनी बनावट खाते उघडले आहे. बनावट फेसबुक अकाउंट बंद करण्यास थोडा वेळ लागतो. “बी. भूषण गुलाबराव” …

Read More »

हत्येनंतर आरोपीने केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची शहराच्या बाहेरील सागरनगरमध्ये किरकोळ भांडणानंतर एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. याबाबत मिळालेली माहिती, किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून यासीन जाटगार (२२) नामक युवकाचा आरोपी रोहित जाधव याने चाकूने भोसकून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी …

Read More »

कलाश्री आयोजित आठरावा “लकी ड्रॉ”ची मानकरी ठरली पिरनवाडीची भावना शिंदे!

  बेळगाव : कलाश्री आयोजित चौथ्या लकी ड्रॉच्या आठरावा लकी ड्रॉ ची सोडत शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी काढण्यात आला. पहिले बंपर बक्षीस ₹. 51000/- चे मानकरी ठरली भावना शिंदे पिरनवाडी (जी एस एस कॉलेज विद्यार्थिनी) बेळगांव. आजचे प्रमुख अतिथी श्री. कृष्णा पाठक (पुजारी शिर्डी संस्थान शिर्डी महाराष्ट्र, श्री. …

Read More »

एक्सलंट योगा क्लासेसतर्फे योग दिन साजरा

  बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेस च्या वतीने अकरावा योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास पाहुणे म्हणून 90 वर्षीय वसंतराव नाईक हे उपस्थित होते तर व्यासपीठावर योगगुरु शंकरराव कुलकर्णी, माधव पुणेकर व अनंत लाड हे उपस्थित होते. …

Read More »

मातोश्री सौहार्द सहकारी संघाचे आज मण्णूर येथे उद्घाटन

  बेळगाव : गोजगा रोड, मण्णूर येथे मातोश्री सौहार्द सहकारी संघाचे (सोसायटी) उद्घाटन आज रविवार दि. २२ जून रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघाचे संस्थापक व चेअरमन आर. एम. चौगुले तर निमंत्रित म्हणून अविनाश पोतदार, एन. एस. चौगुले, डॉ. शिवाजी कागणीकर, डॉ. ए. एम. गुरव, मनोहर …

Read More »