Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव पोलीस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आले आहे. आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे आणि एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

भूषण गुलाबराव बोरसे यांच्या नावाने गुन्हेगारांनी बनावट खाते उघडले आहे. बनावट फेसबुक अकाउंट बंद करण्यास थोडा वेळ लागतो. “बी. भूषण गुलाबराव” असे बनावट  फेसबुक अकाउंट चे नाव आहे. सदर बनावट फेसबुक अकाउंट नावावरून येणारे कोणतेही संदेश स्वीकारू नका असे आवाहन आयुक्तांनी जनतेला केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की ते फक्त बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत आणि त्यांचे फेसबुक अकाउंट किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक नावाने सोशल मीडिया अकाउंट नाही.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *