Sunday , July 26 2026
Breaking News

संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : २१ जून रोजी आदर्श नगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये सुमारे ६०हून अधिक काळजी केंद्रातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला आणि प्राचीन भारतीय योगशास्त्राचे धडे गिरविले. मुळात काळजी केंद्रातील मानसिक रुग्णांची शारीरिक आणि मानसिक पातळी उंचावण्यासाठी कायमस्वरूपी रोज सकाळी योगाभ्यास केला जातो.
आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून योग गुरू राजु चव्हाण आणि फेडरल बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र केएस उपस्थित होते तर अध्यक्षपदी संस्थेच्या सल्लागार सदस्या डॉ नविना शेट्टीगार होत्या.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक कावेरी नेगी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय कावेरी लमाणी यांनी करून दिला
कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. मान्यवरांना शाल, स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
योगगुरू राजू चव्हाण यांनी योग का करावा याबद्दल माहिती दिली.
फेडरल बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र केएस यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. शेट्टीगार यांनी योग हे भारताने जगाला दिलेले एक शास्त्र आहे. ते मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणते. आजकाल डॉक्टर देखील सांधे मजबूत करण्यासाठी आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी योगाची शिफारस करताना दिसत आहेत असे सांगितले. गेल्या अकरा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात हा दिवस योग दीन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली असेही त्या म्हणाल्या.
त्यानंतर योगगुरू राजू चव्हाण यांनी वेगवेगळ्या प्रकारची योगासने करवून घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्री माळी यांनी केले तर आभार सुनील चन्नदासर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *